Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एसटी कर्मचाऱ्यांचे आजच होणार पगार… राज्य सरकारकडून ३०० कोटींचा निधी वितरीत

Spread the love

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यातही अद्याप पगार झाला नसल्याने एसटी कर्मचारी संतप्त होते. एसटी कर्मचारी संघटनांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून या संदर्भात राज्य सरकारने एक परिपत्रक काढले आहे.

एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी सरकारने ३०० कोटी निधी वितरित केलेला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार आता होणार आहे. या निधीतून त्यांच्या बँकेत मूळ वेतनाची रक्कमच जमा होणार आहे. मात्र ग्रॅज्युइटी आणि पीएफचे पैसे भरले जाणार नाहीत. एसटी संप काळात कर्मचाऱ्यांचे वेतन ७ ते १० तारखे दरम्यान देण्याचे आश्वासन राज्य सरकारने कोर्टात दिले होते. मात्र तरीही गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर पगार होत नाही. यामध्ये याही महिन्यात १२ तारीख उलटली तरीही पगार न झाल्याने कर्मचारी संतप्त होते. एसटी कर्मचारी संघटनांनी आक्रमक होऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्याची तातडीने सरकारने दखल घेतली. त्यानंतर ३०० कोटींचा निधी रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम आजच महामंडळाला देण्यात आली असून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आजच होणार आहेत.

दरम्यान, काँगेस प्रणित एसटी संघटनेचे म्हणणे आहे कि, आज एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होणार आहेत, मात्र दिलेली रक्कम अपुरी आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन आणि इतर १६ मागण्यांवर लवकरच उपमुख्यमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा करू असे खोत यांच्या संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, दरमहिना ३६० कोटी देणे गरजेचे आहे. तशी हमी राज्य सरकारने कोर्टात दिली आहे. मात्र दर महिन्याला सरकारकडून अपुरा निधी दिला जात आहे. त्यामुळे कामगारांची देणी देण्यासाठी थकलेली रक्कम १ हजार २०० कोटी झाली आहे.

शिर्डी महामार्गावर, साई भक्तांचा भीषण अपघात १० जणांनाच मृत्यू


#LiveNews #MahanayakNews #MahanayakOnline #Gallitedilli #STEmployeePayment #MaharashtraGovernment #DevendraFadanvis #EknathShinde

 

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

आपलं सरकार

Click to listen highlighted text!