Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिंदेंनी भाजपची साथ सोडली तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ – प्रकाश आंबेडकर

Spread the love

प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकी नंतर आज पत्रकार परिषद घेत प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली आहे. पक्षाची भूमिका बदलेली नाही, भाजपसोबत वंचित कधी गेला नाही आणि जाणारही नाही. एकनाथ शिंदेंनी भाजप सोबतची साथ सोडली तर शिंदेंसोबत जाऊ असे म्हणत शिंदे आणि आंबेडकर युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री बंद दाराआड अडीच तास बैठक झाल्यानंतर शिंदे आणि आंबेडकर, राजकीय चर्चांना उधाण आले. आज पत्रकार परिषद घेत प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, काल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत अनेक चर्चा झाल्या. आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. भाजप ज्यांच्याबरोबर आहे त्यांच्याबरोबर आम्ही कधीही गेलो नाही. आरएसएस आणि भाजपविरोधाले भांडण व्यवस्थेविरोधातले आहे. भाजप आणि मित्रपक्षांबरोबर कोणताही समझोता नाही. जर शिंदेंनी भाजपची साथ सोडली तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ.

तसेच, आम्ही शिवसेनेसोबत जायला तयार आहोत हे आम्ही उघडपणे सांगत आहे. आमची युती झाली पण पब्लिक कमिटमेंट नाही झाली. चार भिंतीमध्ये युती कधी जाहीर करायची हे आता उद्धव ठाकरेंनी ठरवायचे आहे. कॉंग्रेसने आणि राष्ट्रवादीने आमचा खिमा केला आहे. कॉंग्रेस आणि शरद पवारांना ओळखणारा नेता माझ्यासारखा दुसरा नेता नाही. शिवसेनेला कॉंग्रेस फसवेल त्यामुळे त्यांनी अधिक वेळ थांबू नये, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!