Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : कचनेर : सोन्याची मूर्ती चोरी प्रकरण : ३६ तासांच्या आता मध्यप्रदेश येथून दोन आरोपी गजाआड

Spread the love

औरंगाबाद :  कचनेर येथील चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातील भगवान पार्श्वनाथांची १ कोटी ५ लाखांच्या सोन्याच्या मूर्तीची चोरी झाली होती या प्रकरणी मध्यप्रदेश येथून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपास दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये मूर्ती चोरणारा संशयित कैद झाल्याचे दिसून आले. त्याच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांची दोन पथके मध्यप्रदेश, राज्यस्थानकडे रवाना झाली होती.


मंदिराच्या समितीचे महामंत्री विनोद लोहाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार; भगवान पार्श्वनाथांची सोन्याची मूर्ती बदलल्याचे निदर्शनास येत असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त ललित पाटणी यांनी लोहाडे यांना २३ डिसेंबरला रात्री ९.३० वाजता दिली. त्यानुसार शनिवारी सकाळी १० वाजता मंदिराचे विश्वस्त व कार्यकारी मंडळाने मूर्तीची पाहणी केली. तेव्हा मूर्तीमध्ये बदल जाणवला. बदललेल्या मूर्तीचे वजन केल्यानंतर ते ९४२ ग्रॅम भरले. प्रत्यक्षात सोन्याची मूर्ती २ किलो ५६ ग्रॅमची होती. त्यानंतर खासगी सुवर्णकार निलेश पाटणी यांच्याकडून मूर्तीची तपासणी केल्यानंतर बदललेली मूर्ती पितळेची असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर, निरीक्षक देविदास गात, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्यासह इतरांनी मंदिरात जाऊन तपासाला सुरुवात केली.

अर्पित नरेंद्र जैन ( वय ३२, रा. शिवपुरी तहसील जि. गुणा, मध्यप्रदेश) व अनिल भवानीदिन विश्वकर्मा (वय २७, शहागढ, जि. सागर, मध्यप्रदेश) अशी चोरांची नावे असून त्यांच्या ताब्यातून मुर्तीच्या सोन्याचे तुकडे रोख व चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधिक्षक मनोज कलवानीया यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, मंदिर परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर चोरी १४ डिसेंबरच्या सकाळी ७ ते ९ या वेळेत मंदिरातील एक शिष्य सुवर्ण मूर्ती ठेवलेल्या ठिकाणी हात घालून मूर्ती बाहेर काढताना सीसीटीव्हीत कैद झाला. मात्र, त्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात येत नाही. चोरीच्या घटनेपासून तो शिष्य गायब आहे. त्याचा मोबाईल नंबरही बंद येत आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके मध्यप्रदेश, राज्यस्थानकडे रवाना झाली होती.

मूर्ती चोरी प्रकरणातील संशयित व्यक्ति चातुर्मासामध्ये कचनेर येथे तीन महिने वास्तव्यास होता. त्यानंतर तो दि. ११ ते १४ डिसेंबरदरम्यान कचनेर येथे आला, असे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये पोहोचले. एका पथकाने मध्यप्रदेशातून दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी मूर्तीची अदलाबदल केल्याची कबुली दिल्याची वृत्त आहे.

या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. मात्र अवघ्या ३६ तासांच्या आत औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती ग्रामीण पुलिस अधीक्षक महेश कलवानिया यांनी दिली.

पोलिसांचे  समाजातर्फे अभिनंदन

या तपासाबद्दल जैन समाजाच्या वतीने ग्रामीण पुलिस अधीक्षक महेश कलवानिया , उप विभागीय पुलिस अधिकारी जयदत्त भवर ,पुलिस निरीक्षक रामेश्वर रेगे, देवीदास गात ,पुलिस उप निरीक्षक प्रदीप ढूबे , विजय जाधव , सह लहू थोटे, श्रीमंत भालेराव, सह शेख नदीम, राहुल गायकवाड़ ,योगेश तोरमाले, जीवन घोलप आणि सर्व टीम चे अभिनंदन करण्यात येत असल्याची माहिती महावीर पाटणी यांनी दिली आहे.

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!