Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात

Spread the love

पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आमदार गोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

फलटण येथील बानगंगा नदीच्या पुलावरून जाताना आमदार जयकुमार गोरे यांची फॉर्च्युनर ही कार पुलावरून खाली कोसळली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावर लावण्यात आलेल्या तारा तोडून खाली कोसळली असल्याचे वृत्त आहे. गाडीमध्ये आमदार जयकुमार गोरेंसह चारजण जखमी झाले आहेत. यात जयकुमार गोरेंचे दोन अंगरक्षक, चालक आणि खासगी सचिवाचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या आमदार गोरे यांना पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आसे आहे. दरम्यान, गाडीमधील जयकुमार गोरे यांचे अंगरक्षक आणि चालकही यांना बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बारामतीतील डॉक्टरांनी रुग्णांचे प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.

MumbaiNewsUpdate : व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक

भाजप भाजप

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!