Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नागपूर विधानभवनाच्या गेटसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Spread the love

नागपूर विधानभवनाच्या मुख्य दारासमोर एका महिलेने अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. सुरक्षारक्षकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र राज्यात महापुरुष आणि संतांचा अपमान झाल्यामुळे यावर सरकार काही कारवाई करत नाही. यामुळे या महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त आहे.

विधानभवनाच्या मुख्य दारासमोर, तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करता… वारकरी संप्रदायाचा अपमान करता… तुमच्या अधिवेशनात पोलिसांना जेवण मिळत नाही.. तुमच्याकडे कुठलेच मुद्दे शिल्लक नाही… शिवाजी महाराज की जय.. बाबासाहेब आंबेडकर की जय… अशा घोषणा देत अचानकच या महिलेने अंगावर रॉकेल ओतले. तिथल्या सुरक्षारक्षकांनी तिला वेळीच थांबवले आणि हि हि दुर्घटना टाळली. हि महिला सोलापूर येथील असून तिचे नाव कविता चव्हाण असल्याची माहिती आहे. नागपूर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून, नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे.

या आंदोलनकर्त्या महिलेच्या समर्थकांनी निवेद दिले आहे त्यात म्हंटले आहे कि, आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांना बदनाम करणे, त्यांच्याबद्दल खालच्या पातळीचे वक्तव्य करणे हे नित्याचे झाले आहे. अशा प्रकाराने सामान्य जनमानसाची मने दुखावली जाते. आजकाल ज्यांची लायकी नाही, अशी लोकही त्यांच्या मनाला वाटेल त्या पातळीचे वक्तव्य करु महापुरुषांबद्दल अपशब्द बोलत आहेत. याचा आम्ही निषेध करतो. असे बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या विरोधात कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावेत. महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदे करणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणीही अशा प्रकाराचे कृत्य करणार नाही. त्यामुळे जनसामान्यांच्या मनातील खदखद ओळखुन योग्य ती उपाययोजना करण्यात यावी. या अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिस बांधवांना दोन दिवस जेवण उपलब्ध झाले नाही. ही अत्यंत दुःखद बाब आहे. जर रक्षणकर्त्यांच्या पोटाचा प्रश्न उपस्थित होत असेल तर यापेक्षा शरमेची दुसरी गोष्ट असू शकत नाही. असेही निवेदनात म्हटले आहे.

 

नागपूर हिवाळी अधिवेशनातील आजचा गोंधळ…


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!