Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक

Spread the love

मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना आर्थिक अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) अटक केली आहे. आयसीआयसीआय बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. चंदा कोचर यांनी पती दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.


चंदा कोचर मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन समुहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिलं होतं. एप्रिल २०१२ मध्ये हे कर्ज देण्यात आले होते. यातील २,८१० कोटी रुपयांचे थकीत होते. २०१७ मध्ये हे बुडीत कर्ज म्हणून जाहीर करण्यात आले. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) चंदा कोचर आणि पती दीपक कोचर यांची चौकशी करत अटक केली होती. त्यानंतर चंदा कोचर आणि दीपक कोचर हे जामीनावर बाहेर होते. त्यातच आता सीबीआयने त्यांना अटक केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!