Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शासनाने शाळा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला नाही

Spread the love

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ० ते २० पटसंख्येच्या शाळा बंद होणार असल्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असतांना शासनाचा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणायचा विचार नाही. केवळ सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी विधानसभात केले आहे.

चौथ्या दिवशी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या ० ते २० पटसंख्येच्या शाळा बंद होणार असल्याच्या मुद्द्यावर आज लक्षवेधी मांडण्यात आली. यादरम्यान चर्चेत विरोधकांनी अतिशय आक्रमकपणे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर प्रश्नांचा वर्षाव केला. अनेक आमदारांनी आपापल्या भागातील शाळांविषयीच्या समस्या मांडल्या. यावर उत्तर देताना केसरकरांनी एकही शाळा बंद करणार नाही, असे रोखठोकपणे सांगितले आहे. केसरकर म्हणाले, “० ते २० पटसंख्येच्या शाळा सध्या बंद करणार नाही. केवळ सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. खर्च जास्त होतो म्हणून बंद करणार नाही. सर्वाना विश्वासात घेऊनच निर्णय घेऊ. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा शासनाचा उद्देश आहे”

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरक यांच्या उत्तराने काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचे समाधान झाले नाही.एक बालक असेल तरी त्याला सर्व सुविधा देणे हे शासनाची जबाबदारी आहे. सर्वेक्षणातून शिक्षण विभागात गोंधळ निर्माण केला जात आहे. अद्याप विचार नाही असे उत्तर नको. स्पष्ट उत्तर द्या, अशा शब्दात त्यांनी केसरकरांना फटकारले. तसेच त्यांना उत्तर देताना केसरकर म्हणाले, “आम्ही एकही शाळा बंद करणार नाही. एक किलोमीटरच्या आत शिक्षण देण्याचे बंधन आहे. शाळा बंद करण्यासंदर्भात कुठलाही निर्णय शासनाने घेतला नाही”

शिक्षकांची ५० टक्के भरती लवकरच करण्यात येणार आहे. पुढच्या एक महिन्यात ही प्रक्रिया पार पाडली जाईल. निवृत्त शिक्षकांना पुन्हा संधी देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अडचण दूर करू. याचा भार ग्रामपंचायतीवर येणार नाही. राज्य शासन याची जबाबदारी घेईल, असेही केसकर यांनी या वेळी स्पष्ट सांगितले आहे.

CongressNewsUpdate : भारत जोडो यात्रा थांबवण्यासाठी आरोग्य मंत्र्यांचे पत्र आणि काँग्रेसचे पत्राला उत्तर , तुम्हाला गांभीर्य आहे का ?

 

 

News Updates on one click

Mahanayak Online | Current News Update

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!