Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मणिपूर : बस अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

Spread the love

मणिपूरमधील नोनी जिल्ह्यात बुधवारी सहलीवर निघालेल्या स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे. बस पालटल्याने सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे २० जण जखमी झाले आहेत त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मणिपूर नोनी जिल्ह्यातील थंबलानु उच्च माध्यमिक शाळेचे विद्यार्थी बुधवारी सकाळी दोन बसेसमध्ये नोनी जिल्ह्यातील खौपुम येथे वार्षिक सहलीसाठी जात होते. जिल्ह्य़ातील लोंगसाई भागाजवळील जुन्या काचार रोडवरील वळणावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस अचानक उलटली. यात पाच विद्यार्थी जागीच ठार झाले आहेत. जखमी विध्यार्त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे इतर दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

जुनी पेन्शन योजना आणि शाळांबाबत राज्य सरकारचे स्पष्ट उत्तर

 

News Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!