Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बुलढाणा : बाळाला दुचाकीवर दूध पाजताना महिलेचा मृत्यू

Spread the love

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यात, राष्ट्रीय महामार्गावरील कोलरीनजीक येथे दुचाकीवरुन जाताना बाळाला दूध पाजताना खाली पडल्याने डोक्याला मार लागून महिलेचा मृत्यू झाला आहे. चिमुकली तोंडाला मार लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

अकोला येथील देशमुख दाम्पत्य लहान मुलीला घेऊन खामगाव येथे आले होते. दरम्यान काल रात्री ते दुचाकीने अकोलाकडे निघाले होते. यावेळी शितल आबाराव देशमुख या धावत्या दुचाकीवर आपल्या २ वर्षांच्या मुलीला दूध पाजत होत्या.अचानक खड्डयात दुचाकी आदळल्याने शितल देशमुख या लहान मुलीसह रोडवर पडल्या. यात डोक्याला मार लागल्याने शितल देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चिमुकली रियांशीला तोंडाला मार लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी नोंद केली आहे.

 

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’बाबत कायदा? उपमुख्यमंत्र्यांचं मोठं विधान…

 

News Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!