Karnataka । विधानसभा सभागृहात लावला सावरकरांचा फोटो…

बेळगावात कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात मोठा गदारोळ झाला आहे. विधानसभा सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो लावल्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. विरोधीपक्ष नेते सिद्धारमैया व अन्य नेते विधानभवनाच्या बाहेर आंदोलन करत विरोध केला आहे.
Belagavi | VD Savarkar's portrait unveiled in Karnataka Assembly hall. Congress MLAs have staged a protest with LoP Siddaramaiah writing to Speaker to install portraits of personalities like Valmiki, Basavanna, Kanaka Dasa, BR Ambedkar, Sardar Vallabhbhai Patel and many others. pic.twitter.com/Esgdl8bdgP
— ANI (@ANI) December 19, 2022
सभागृहाचे कामकाज बंद पडावे यासाठी सरकार अशा हरकती करत आहे. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांवर सरकारच्या विरोधात आम्हाला बोलायचे आहे, त्यासाठी त्यांनी हे पोस्टर लावून वाद निर्माण केला आहे. त्यांच्याकडे कोणताही विकासाचे मॉडेल नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते सिद्धारमैया यांनी सभागृहाअध्यक्षना पत्र लिहून सभागृहात वाल्मिकी, बासवन्ना, कनक दास, बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल व अन्य नेत्यांचे फोटो लावावे, अशी मागणी केली आहे.
#BorderDispute | महाविकास आघाडीच्या नेत्यांवर लाठीमार…
महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याला आयोजन केले आहे. त्यासाठी खासदार धैर्यशील माने येणार होते. मात्र, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असे कारण देऊन त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. फौजदारी संहितेच्या कलम १४४ (३) नुसार खासदार माने यांना ही बंदी घालण्यात आली असून, बेळगावचे जिल्हाधिकारी नीतेश पाटील याबाबतचा आदेश दिला आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील कोगनोळी चेक पोस्टवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Karnataka | LoP Siddaramaiah and other Congress MLAs protest outside the Assembly against the installation of a portrait of VD Savarkar in the Assembly hall. pic.twitter.com/rq2glzkk3F
— ANI (@ANI) December 19, 2022
#BorderDispute | महाविकास आघाडीच्या नेत्यांवर लाठीमार…
Belagavi, Karnataka | Members of Maharashtra Ekikaran Samiti and NCP stage protest near Kognoli Toll Plaza near Karnataka-Maharashtra border over inter-state border issue pic.twitter.com/XaPJwEbBKv
— ANI (@ANI) December 19, 2022
News Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055