Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Live Updates । महाविकास आघाडीच्या महामोर्चाचे लाईव्ह अपडेट्स

Spread the love

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांच्या महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चासाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. सुमारे अडीच हजार पोलिस, दोन अतिरिक्त आयुक्त, चार उपायुक्त यांच्यासह एसआरपीएफ, दंगल नियंत्रण पथक, असा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी जे. जे. मार्ग येथील रिचर्ड अँड क्रुडास कंपनी ते आझाद मैदानापर्यंत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार असल्याने त्याआधीपासूनच पोलिस नेमून दिलेल्या ठिकाणी बंदोबस्तासाठी उभे असतील. कुणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, असे कृत्य करू नये, असा इशारा पोलिसांच्या वतीने देण्यात आला. बंदोबस्ताबरोबरच पोलिसांनी विशेष शाखा, गुन्हे शाखा यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • उद्धव ठाकरेंनी आम्हाला सामावून घेतले नाही तर आम्ही एकटे लढू पण भाजपसोबत जाणार नाहीत. शरद पवारांचा आम्हाला विरोध कायम – प्रकाश आबंडेकर

 

  • राज्यपालांना एक मिनिट देखील खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही – संजय राऊत

  • आजचा मोर्चा सरकार उलथून टाकण्यासाठी पहिलं पाऊल – संजय राऊत

 

  • मोर्चात संजय राऊत, सुप्रिया सुळे सहभागी; कार्यकर्त्यांच्या हाती पक्षाचे झेंडे

 

  • उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि नाना पटोले मोर्चात सहभागी

 

  • उद्धव ठाकरे महामोर्चासाठी मातोश्रीहून रवाना; थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या  मोर्चाला सुरुवात होणार

 

  • पुण्यातून भाजपचे आंदोलन. पुण्यातील अलका चौकात भाजपचं आंदोलन. बिलावल भुट्टोंच्या वक्तव्याचा निषेध.

 

  • शरद पवार वाय.बी.चव्हाण सेंटरकडे रवाना. शरद पवार सभास्थळी दुपारी १२.३० वाजता दाखल होणार. शरद पवार मविआच्या सभेला संबोधित करणार.

 

  • आज महाविकास आघाडीचा महामोर्चा; फलक, झेंडे घेऊन कार्यकर्ते मोर्चात सहभागी

 

  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेरील बंदोबस्तात वाढ

 

  • काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातही मोर्चात सहभागी. रिचर्डसन क्रुडाजवळ कार्यकर्त्यांची गर्दी

 

  • महामोर्चासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईदत दाखल. रिचर्डसन अँड क्रुडासपासून मोर्चा सुरू होणार. महामोर्चाची सांगता ‘टाइम्स ऑफ इंडिया’समोर. लाखो कार्यकर्ते सहभागी होणार, मविआचा दावा.

 

  • मोर्चाआधी महाविकास आघाडीची बैठक. मुंबई सेंट्रलमधील हॉटेलमध्ये मविआ नेत्यांची बैठक

 

  • मुंबई : महापुरुष अवमान प्रकरणावरून महाविकास आघाडीकडून मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सहभागी होणार

 


News Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!