Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SolapurNewsUpdate : भाजप नेत्यांविरुद्ध संतापाची लाट कायम , सोलापुरात आमदाराच्या अंगावर शाई फेकली …

Spread the love

सोलापूर : महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुषंगाने बदनामीकारक वक्तव्य करणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितल्यानंतरही भाजप नेत्यांविरुद्धची संतापाची लाट कायम आहे.  पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना सोलापूर शहर उत्तर मधील भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावरही  एका तरुणाने शाई फेक केली असल्याचे वृत्त आहे.


सोलापूर शहरातील सम्राट चौक येथील एका सामुदायिक विवाह सोहळ्यात आज मंगळवार दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली आहे. न्यू बुधवार पेठ येथील बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जोपर्यंत चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत भाजपाच्या एकाही नेत्याला कार्यक्रमास जाऊ देणार नाही, फिरू देणार नाही आणि जर गेलेच तर तोंडाला काळं फासल्याशिवाय भीम आर्मी शांत बसणार नाही, असा जाहीर इशारा भीम आर्मीने  दिला होता.

दरम्यान सोलापूर शहरातील न्यू बुधवार पेठ येथे बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित एका विवाह सोहळ्याला आमदार विजयकुमार देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते त्याठिकाणी गेले असता भीम आर्मीच्या अजय मैनदरगीकर या कार्यकर्त्याने भाजप आमदारावर शाई फेकून त्यांना काळे फासण्याच्या प्रयत्न केला आहे. आमदार देशमुख यांच्या अंगावर शाई फेकण्यात आल्याची माहिती होताच उपस्थित पोलिसांनी ताबडतोब भीम आर्मीच्या कार्यकर्त्यास ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी भीम आर्मीच्या युवकाला ताब्यात घेऊन जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतरही आमदार देशमुख हे शर्ट बदलून त्या कार्यक्रमाला तिथेच थांबले .

 

#OutOfBox | टाकीचे घाव : शाबा यांच्या खडतर जीवनप्रवासाची हृदयद्रावक गाथा


News Update on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!