Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Parliament Winter Session। नवीन खासदारांना संधी द्या…

Spread the love

आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन २९ डिसेंबर २०२२ पर्यंत चालेल. या अधिवेशनाचे एकूण १७ कामकाजाचे दिवस असतील. या अधिवेशनात १६ विधेयके सादर केली जाणार असल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये डेंटल कमिशन विधेयक, राष्ट्रीय नर्सिंग आणि मिडवायफरी कमिशन विधेयक, मल्टिस्टेट सहकारी संस्था सुधारणा विधेयक, जुने अनुदान लिनियमन विधेयक, वन संरक्षण संशोधन विधेयक याचा समावेश आहे.

अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी देशासह तरुण खासदारांना आवाहन केले आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, जी-२० चे अध्यक्षपद भारताला मिळणे ही मोठी संधी आहे. यामुळे भारताला आपले सामर्थ्य दाखवण्याची संधी मिळाली आहे, विश्वात भारताकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भारताला आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत आहे. दरम्यान देशाचे आणि जी-२० संबंधित महत्वाचे निर्णय अधिवेशनात होतील. असे ते म्हणाले. जी-२० शिखर परिषद ही भारताची क्षमता जगासमोर मांडण्याची संधी आहे. एवढा मोठा देश, लोकशाही, इतकी विविधता, एवढी क्षमता, हे सर्व जगाला कळायला हवे. भारताला आपली क्षमता संपूर्ण जगाला दाखवण्याची संधी आहे. यापूर्वी सर्व पक्षांच्या अध्यक्षांशी चर्चा झाली आहे. त्याचे प्रतिबिंब सभागृहातही दिसणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले कि, भारताला जगात पुढे नेण्याची संधी लक्षात घेऊन नवे तसेच ऐतिहासिक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी खात्री आहे की, सर्व राजकीय पक्ष चर्चा करून देशाचे मूल्य वाढवतील. संसदेच्या या अधिवेशनाला वेळ शिल्लक असताना, मी सर्वपक्षीय नेत्यांना आग्रह करू इच्छितो. जे पहिल्यांदाच सभागृहात आले आहेत. नवीन खासदारांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि लोकशाहीच्या भावी पिढीला तयार करण्यासाठी जास्तीत जास्त संधी द्या. त्यांचा चर्चेतील सहभाग वाढला पाहिजे. यापूर्वी मी सर्व पक्षांच्या खासदारांसोबत अनौपचारिक बैठका घेतल्या आहेत. यात एक गोष्ट नक्की सांगितली जाते की, सभागृहात गदारोळ होतो आणि कामकाज तहकूब झाल्याने या नव्या खासदारांचे खूप नुकसान होते. आम्हाला जे सांगायचे आहे ते राहून जाते. पुढे ते म्हणाले, विरोधी पक्षाचे खासदारही तेच सांगतात. वादात बोलण्याची संधी मिळत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मला वाटते सर्व पक्षाच्या नेत्यांना या खासदारांच्या वेदना समजतील. त्यांच्या क्षमतेत भर घालण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी. त्यांच्या उत्साहाचा देशाला लाभ होवो. लोकशाहीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. मी सर्व पक्षांना आणि सर्व खासदारांना विनंती करतो की, त्यांनी हे अधिवेशन अधिक फलदायी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत. या अधिवेशनात आणखी एक भाग्याची गोष्ट आहे की, एका शेतकऱ्याचा मुलगा आज देशाच्या राज्यसभेचा अध्यक्ष झाल्याने देशाची शान वाढणार आहे.

MaharshtraPoliticalUpdate : सीमा प्रश्नावर अॅक्शनला रिअॅक्शन दिली तर या गोष्टी वाढत जातील, फडणवीसांचे पवारांना उत्तर …

News Update on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!