Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

…स्वतः हजर राहून पश्चाताप व्यक्त करण्यात काही अडचण आहे का?

Spread the love

विवेक अग्निहोत्री यांनी ६ डिसेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाची विनाअट माफी मागितली. विवेक अग्निहोत्री यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना जामीन देण्यावरून दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती आणि विद्यमान ओरिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणात विवेक अग्निहोत्रीने प्रतिज्ञापत्र दाखल करत विनाअट माफी मागितली. न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदूल आणि न्यायमूर्ती तलवंत सिंह यांच्या खंडपीठाने प्रतिज्ञापत्राद्वारे विनाअट माफी पुरेशी नसल्याचे म्हटले आहे. तसेच पुढील सुनावणीला १६ मार्च २०२३ रोजी विवेक अग्निहोत्रीने स्वतः न्यायालयासमोर हजर व्हावे, असे मत नोंदवले आहे.

दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले कि, “न्यायालयाचा अवमान करणारा व्यक्ती स्वतः विवेक अग्निहोत्री आहे. त्यामुळे त्याने पुढील सुनावणीत प्रत्यक्ष हजर राहावे. स्वतः हजर राहून पश्चाताप व्यक्त करण्यात त्याला काही अडचण आहे का? माफी कायम प्रतिज्ञापत्र दाखल करूनच मागितली पाहिजे असे नाही.” विशेष म्हणजे माफी मागताने विवेक अग्निहोत्रीने आपण स्वतः ते ट्वीट नंतर डिलीट केल्याचा दावा केला. मात्र, अमिकस क्युरी अरविंद निकम यांनी ट्विटरने आपल्या प्रतिज्ञापत्रात ट्विटरने हे ट्वीट हटवल्याचे म्हटले आहे हे लक्षात आणून देत विवेक अग्निहोत्रीचा दावा फेटाळला.

भीमा कोरेगाव प्रकरणात तत्कालीन दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांनी आरोपी आणि मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर विवेक अग्निहोत्रीने ट्वीट करत न्यायमूर्ती मुरलीधर यांच्यावर पूर्वग्रह आणि पक्षपातीपणाचा आरोप केला होता.याच ट्विटवरून विवेक अग्निहोत्रीच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला दाखल झाला. सप्टेंबर २०२२ मध्ये न्यायालयाने विवेक अग्निहोत्री आणि इतरांविरोधातील खटल्यावर पुढे सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता.

 


IndiaNewsUpdate : कमाल झाली !! पोस्टरवर छापला डॉ . बाबासाहेबांचा भगव्या वस्त्रातील फोटो …!!

News Update on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!