Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गेल्या सात वर्षांपासून तो भोगत आहे न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा

Spread the love

अलीगढमध्ये सात वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीची अपहरण करुन हत्याप्रकरणात तिच्या घराशेजारीच राहणाऱ्या विष्णुला अटक करण्यात आली होती. कोर्टात केस उभी राहिली आणि त्याला शिक्षादेखील झाली. गेल्या सात वर्षांपासून तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मात्र, आता जिच्या हत्येच्या आरोपाखील विष्णु शिक्षा भोगत आहे तिच मुलगी आता जिवंत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

१७ फेब्रुवारी २०१५मध्ये, १० वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी गावातील विष्णु नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला जात होता. अनेक महिने शोध घेतल्यानंतर आग्रा येथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला. कपड्यांवरुन तिच्या वडिलांनी ही आपलीच मुलगी असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर विष्णुवर हत्येचा आरोप करण्यात आला होता.अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले आणि हत्या करुन पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली.

२५ सप्टेंबर २०१५ साली त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर विष्णुला जेलमध्ये जावे लागले. मात्र, एकीकडे त्याच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीची माहिती काढण्यास सुरुवात केली. विष्णूच्या आईला काही जणांनी ती तरुणी जिवंत असल्याची माहिती दिली. त्याचवेळी त्यांना ती मुलगी जिवंत असून आता तिच वय २१ वर्ष असल्याची माहिती मिळाली. तरुणी जिवंत असल्याने विष्णुच्या आईने पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ती हाथरस येथे राहत असून तिने तिथे संसार थाटला आहे. तिला दोन मुलंदेखील आहेत, असा दावा करण्यात आला आहे. विष्णूच्या आईने ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी हाथरसमध्ये जाऊन मुलीला चौकशीसाठी अलीगढला आणले असून न्यायालयात हजर केले आहे. तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. मुलीची डीएनए चाचणी करावी, अशी मागणी विष्णूच्या कुटुंबीयांनी केली आहे.

 


ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन


News Update on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!