MaharashtraPoliticalUpdate : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आज महत्वपूर्ण बैठक …

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात उद्या बैठक होणार असल्याचे वृत्त आहे . वंचित बहुजन आघाडीचे आणि शिवसेनेचे नेते यांच्यात बैठकीची एक प्राथमिक फेरी झाली असून आजच्या बैठकीत यावर काय निर्णय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यानच्या काळात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन्हीही नेते एकत्र आले होते. या कार्यक्रमातच उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना सोबत एनचे आवाहन केले होते तर त्याच्या आधी वंचितच्या वतीने आम्ही काँग्रेस आणि शिवसेना यांना आगामी निवडणुकीच्या दृष्टीने युतीची ऑफर दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आजची ही दोन नेत्यांची बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे.
असे सांगण्यात येत आहे की , आज दुपारी १२ वाजता, महालक्ष्मी फोर सिझन हॉटेलमध्ये ही बैठक होत असून उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि वंचितची युतीबाबतची ही पहिली अधिकृत बैठक असेल. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व आले आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या संकेतस्थळाच्या उद्धाटन कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र आले होते. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबडेकर एकत्र आल्याने युतीची चर्चा रंगली होती. यावेळी दोघांचे वैचारिक व्यासपीठ एकच असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतील हे निश्चित झाले होते. त्यानंतर सुभाष देसाई आणि प्रकाश आंबडेकर यांच्यात चर्चेच्या दोन बैठका झाल्या होत्या.