Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Viral Video Update : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही जीभ घसरली , शिवरायांचा केला एकेरी उल्लेख …

Spread the love

औरंगाबाद : ‘हर हर महादेव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवल्यावरून आधीच संभाजी राजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केलेला असताना आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा निषेध होत असतानाच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा  छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल झाल्याने पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. 


शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने एका वादग्रस्त वक्तव्यावर त्यांची प्रतिक्रिया देताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करीत महाराजांवरील वक्तव्याची चौकशी व्हायला हवी आणि राज्यपालांचे वक्तव्य वादग्रस्त होईल की नाही, हे तपासण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे. शिवाय आपण स्वतःही शिवप्रेमी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतरही राज्यात वातावरणअधिक पेटण्याची चिन्हे आहेत. टीव्ही ९ च्या वृत्तानुसार साताऱ्यात त्यांच्या या वक्तव्याचे जोरदार पडसाद दिसून आले असून खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला घेतला आहे. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पोवई नाक्यावरील शिवतीर्थाजवळ रावसाहेब दानवे,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप पक्षा विरोधात घोषणबाजी केली. तर मराठा संघटनांही याप्रकरणात आक्रमक झाल्या आहेत.

दरम्यान आज सकाळी ढोल बजाव , मंत्री जगाव असा नारा देत मराठा क्रांती मोर्चा आणि शिव भक्तांनी राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या घरावर जाऊन घोषणाबाजी करीत राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी आपण जनतेच्या भावना वरिष्ठापर्यंत पोहोचवू असे आश्वासन सावे यांनी दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!