Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#MadhyaPradesh : भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याने शिक्षकाचे निलंबन

Spread the love

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता मध्यप्रदेमध्ये आहे. मध्य प्रदेशमधील बडवानी जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षकाचे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याच्या कारणावरुन निलंबन करण्यात आले आहे. या घटनेमुळं काँग्रेसने जोरदार निशाणा साधला आहे. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या कनस्या येथील प्राथमिक शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना २५ नोव्हेंबरला सेवेतून निलंबित करण्यात आले असून याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे.

अखेर प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली

राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी सेवेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

शिक्षकाने महत्त्वाचे काम असल्याचे सांगून सुट्टी घेतली होती. मात्र, त्यांनी एका राजकीय कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याचबरोबर त्याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले, अशी माहिती आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त एन. एस. रघुवंशी यांनी दिली. संबंधित शिक्षकाने नियमांचे उल्लंघन आणि राजकीय कार्यक्रमात सहभाग घेतल्याच्या कारणावरुन निलंबन करण्यात आले. २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेत नियमांचे उल्लंघन केले, असे त्यांच्या निलंबनाच्या आदेशात नमूद केले आहे.

शिक्षकाला निलंबित केल्यानंतर मध्य प्रदेश काँग्रेसच्या मीडिया विभागाने एक ट्विट केले आहे. शिवराज सिंह चौहान यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. मात्र, एका आदिवासी समाजाच्या शिक्षकाला राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी झाल्याबद्दल निलंबित केले, असे सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष केके मिश्रा यांनी म्हटले आहे.

bharat jodo yatra

News Update on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

bharat jodo yatra

आपलं सरकार

Click to listen highlighted text!