Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliceNewsUpdate : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, औरंगाबादच्या उज्वला वनकर जालना एसआरपीएफला

Spread the love

मुंबई : राज्यातील २५ पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून या बदल्या अपेक्षित होत्या. अखेर मंगळवारी त्याबाबतचे आदेश काढण्यात आले. त्यात पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.


गृहविभागाच्या आदेशानुसार श्रीकांत धिवरे यांची पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी, तर उज्ज्वला वनकर यांची जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक म्हणून बदली करण्यात आली आहे. इतर २३ पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधीक्षकांमध्ये अर्चना पाटील यांची हिंगोलीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी, रत्नाकर नवले यांची मुंबईच्या यूसीटीसी फोर्स वनच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी, सागर कवडे यांची वर्धा येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी, अशोक वीरकर यांची मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलीस अधीक्षकपदी, प्रशांत होळकर यांची मुंबईच्या राज्य मानवी हक्क आयोगच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

प्रसाद अक्कानूर यांची मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी, डी. के पाटील-भुजबळ यांची नागपूरच्या नक्षलविरोधी अभियान पोलीस अधीक्षकपदी, अरिवद साळवे यांची महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी, पी. पी शेवाळे यांची महाराज्य राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी संचालकपदी, प्रशांत मोहिते यांची नवी मुंबई पोलीस उपायुक्तपदी, निलेश अष्टेकर यांची पुण्याच्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्तपदी, विजयकांत सागर यांची नागपूर शहर पोलीस उपायुक्तपदी, प्रशांत वाघुंडे यांची नवी मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती केली गेली आहे.

योगेश चव्हाण व निलेश मोरे यांची मुंबईच्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्तपदी, विजय पवार यांची धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी, संदीप जाधव यांची ठाण्याच्या नागरी हक्क संरक्षणाच्या पोलीस अधीक्षकपदी, विक्रम साळी यांची नाशिकच्या नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!