Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BJPNewsUpdate : गुजरात निवडणुकांच्या निमित्ताने अमित शहा यांनी काढली २००२ ची आठवण….

Spread the love

अहमदाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सांगितले की, पूर्वी गुजरातमध्ये असामाजिक घटक हिंसाचारात भाग घेत असत आणि काँग्रेस त्यांना पाठिंबा देत असे. पण २००२ मध्ये ‘दंगलखोरांना धडा शिकवल्यानंतर’ गुन्हेगारांनी अशा कारवाया थांबवल्या आणि भारतीय जनता पक्षाने राज्यात ‘कायम शांतता’ आणली. गुजरातमध्ये, फेब्रुवारी २००२ मध्ये, गोध्रा रेल्वे स्थानकावर एका ट्रेनला आग लागल्यानंतर राज्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला.


पुढील महिन्यात राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शहा यांनी खेडा जिल्ह्यातील महुधा येथे भाजप उमेदवारांसाठी  रॅली घेतली. त्यांनी आरोप केला कि , “गुजरातमध्ये काँग्रेसच्या राजवटीत (१९९५ पूर्वी) वारंवार जातीय दंगली होत होत्या. काँग्रेस विविध समाज आणि जातींच्या सदस्यांना एकमेकांविरुद्ध भडकावत असे. अशा दंगलीतून काँग्रेसने आपली व्होट बँक मजबूत केली आणि समाजातील एका मोठ्या वर्गावर अन्याय केला.

गुजरातमध्ये २००२ च्या दंगली घडल्याचा दावा शाह यांनी केला कारण काँग्रेसच्या दीर्घकाळ समर्थनामुळे गुन्हेगारांना हिंसाचार करण्याची सवय झाली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणाले, “परंतु २००२ मध्ये ‘दंगलखोरांना धडा शिकवल्यानंतर’ अशा घटकांनी तो (हिंसेचा) मार्ग सोडला. ते २००२ ते २०२२ या काळात हिंसेपासून दूर राहिले.” ते म्हणाले की, जातीय हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करून भाजपने गुजरातमध्ये शाश्वत शांतता प्रस्थापित केली आहे.

दरम्यान जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे संविधान कलम ३७० रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानताना शाह यांनी काँग्रेस ‘व्होट बँके’मुळे याच्या विरोधात असल्याचा आरोप केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!