Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर …

Spread the love

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत घेत भूमिका मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “या राज्यात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे मी यापूर्वीही माझे  मत मांडलेले  आहे आणि आता जे काय सुरू आहे, गेली चार-पाच महिन्यांमध्ये जे काय आमचं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराचे  शिवसेना-भाजपा युतीचे सरकार काम करतय, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, धडकी भरली आहे की आता काय होणार पुढे? आणि सगळे जे काय प्रकार आहेत, ते त्यातूनच पुढे येत आहेत.”

याशिवाय “छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार कुणाला आहे? बाळासाहेबांचं हिंदुत्व त्यांचे  विचार मोडूनतोडून टाकणाऱ्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे का? सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले आणि तडजोड केली. यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही.” असेही शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!