Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

JalnaNewsUpdate : धक्कादायक : चहामध्ये गुंगीचे औषध टाकून महिलेवर सामूहिक बलात्कार तर व्हिडीओ पाहून पतीचेही निधन …

Spread the love

मुंबई : जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेत एका महिलेला चहामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच त्यावेळी आरोपींनी पीडितेचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून मागील वर्षभर तिला ब्लॅकमेल केले. इतकेच नाही तर या प्रकरणाचा  व्हिडीओ थेट तिच्या पतीलाही पाठवण्यात आला. दरम्यान पत्नीचा हा  व्हिडीओ पाहून या धक्क्याने पीडितेच्या पतीचाही मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.


भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना राज्यातील माय-माऊलींनी असे प्रकार घडल्यास घाबरून न जाता पुढे येऊन याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले असून सरकार आणि पोलीस  तुमच्यासोबत असल्याचा विश्वासही दिला आहे.

आपल्या व्हिडिओमध्ये चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की , “जालना जिल्ह्यात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षभरापूर्वी एका महिलेला चहामध्ये गुंगीचं औषध पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यावेळी काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले. यानंतर गेले वर्षभर या महिलेला विविध प्रकारे ब्लॅकमेल करण्यात आले. आता तर कहर इतका झाला की, हे व्हिडीओ आणि इतर संभाषणाच्या क्लिप्स पीडित महिलेच्या पतीला पाठवण्यात आल्या आणि त्या धक्क्याने पीडित महिलेच्या पतीचा मृत्यू झाला.

पुढे या आणि पोलिसांकडे तक्रार करा…

चित्रा वाघ यांनी पुढे म्हटले आहे की, झालेली घटना वाईटच आहे. मात्र, या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वर्षभरापूर्वी त्या महिलेसोबत ही घटना घडली तेव्हाच तत्काळ त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करून गुन्हा नोंदवला असता तर आजचा अनर्थ कदाचित टळला असता. मला महाराष्ट्रातील सर्व मैत्रिणींना, माय-माऊलींना, भगिणींना सांगायचे आहे की, अन्याय, अत्याचार झाला तर सहन करू नका. पुढे या आणि पोलिसांकडे तक्रार करा. सरकार तुमच्यासोबत आहे, पोलीस तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे कसलीही भीती न बाळगता पुढे येऊन गुन्हा नोंद करा.

जालन्याचे पोलीस अधीक्षक या प्रकरणाचा पूर्ण तपास करत आहेत. त्या प्रकरणात पुढे कार्यवाही होत आहे, तपास सुरू आहे. येणाऱ्या काळात यातील इतर अपडेट्स येतील. परंतु या घटना होऊ नये म्हणून आपणही तितकंच सतर्क राहिलं पाहिजे,” असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!