Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मेरे देश मे : दलित महिलेने पाणी प्यायले, गोमुत्राने पाण्याच्या टाकीचे केले शुद्धीकरण !!

Spread the love

बंगळुरू : कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात एका दलित महिलेने  नळाचे पाणी प्यायल्यानंतर तथाकथित उच्चवर्णीय लोकांनी टाकीतील पाणी काढून टाकले. त्यानंतर शुद्धीकरणाच्या नावाखाली नळ उघडून गोमूत्राने धुतले असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.


१८ नोव्हेंबर रोजी, कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील हेग्गोट्टारा गावात विवाह समारंभासाठी आलेल्या अनुसूचित जातीच्या महिलेने तथाकथित सवर्ण लोक राहत असलेल्या भागात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून पाणी प्यायले होते. हा सर्व प्रकार तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने महिलेला तेथून हटवले. त्यानंतर शुद्धीकरणाच्या नावाखाली नळ उघडून गोमूत्राने धुतले. अगदी टाकीचे संपूर्ण पाणी वाहून गेले आणि तेही स्वच्छ करण्यात आले. तेथे उपस्थित काही व्यक्तींनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली.

दरम्यान स्थानिक तहसीलदार आय.ई. बसवराज यांनी सांगितले की, “पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली होती, परंतु ती गोमूत्राने स्वच्छ करण्यात आली होती याची मी पुष्टी करत नाही. आम्ही घटनेची चौकशी करत आहोत आणि या घटनेत सहभागी असलेल्या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत.असे काही आढळल्यास संबंधित आरोपींविरुद्ध भेदभावाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. सध्या या प्रकरणाची चौकशी चालू आहे.

याविषयी अधिक माहिती देताना स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, गावात अनेक टाक्या आहेत, जेणेकरून प्रत्येकाला तेथून पाणी पिता येईल. स्थानिक अधिकाऱ्यांनी दलित आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील अनेक गावकऱ्यांना सर्व टाक्यांमध्ये नेऊन पाणी दिले. पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार आता जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!