Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

DhuleNewsUpdate : धक्कादायक : पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांची आत्महत्या …

Spread the love

धुळे :  पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे  जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सह्याद्री अपार्टमेंटमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी आत्महत्या केली.  याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  आपल्या सुसाईड नोट मध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटल्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली याची नेमकी माहिती मिळू शकली नाही.


काल सायंकाळच्या सुमारास ही धक्कादायक उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रवीण कदम यांच्या निवासस्थानाची पाहणी केली. यावेळी त्यांना या ठिकाणी एक सुसाईड नोट मिळून आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण कदम हे उत्तम बासरी वादक तसेच कॅसिओ वादक असून त्यांना संगीताची मोठी आवड होती. तसेच प्रवीण कदम हे सर्पमित्र देखील होते. मात्र त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत  पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र त्यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान माझ्या आत्महत्येस मी स्वतः जबाबदार असून इतर कोणालाही दोषी धरू नये, मात्र  गंगापूर पोलीस स्टेशन येथील फेटल गुन्हा त्यास कारणीभूत असल्याचे  यात लिहले आहे. प्रवीण कदम हे नाशिक येथील गंगापूर पोलीस ठाण्यात असताना एका अपघाताशी संबंधित हे प्रकरण असल्याचे सांगण्यात येत असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!