News Update | ओवेसीवर हल्ला करणाऱ्या आरोपींचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

The Supreme Court rejected the bail of the accused who attacked Owaisi
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आठवडाभरात आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. अलाहाबाद हायकोर्टाचा जामीन मंजूर करण्याचा निर्णय बदलून सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की. या दोन आरोपींविरुद्धच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये टोल प्लाझा येथे ओवेसींच्या गाडीवर हल्ला केल्याचा पुरावा आहे. दोघांनाही जामीन देण्याच्या निर्णयात उच्च न्यायालयाने कारणे दिलेली नाहीत, त्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणी पुन्हा सुनावणी घ्यावी. आरोपींनी आत्मसमर्पण केल्यानंतर चार आठवड्यांच्या आत या प्रकरणाचा पुनर्विचार करण्यात यावा. असे ही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
३ फेब्रुवारीला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी एका रॅलीला संबोधित करून असदुद्दीन ओवेसी मेरठहून दिल्लीला रात्री परतत होते. तेव्हा दोन्ही आरोपींनी टोल प्लाझा येथे थांबलेल्या ओवेसींच्या गाडीवर गोळीबार केला होता. ज्यात ते थोडक्यात बचावले होते. उच्च न्यायालयाच्या जामीन देण्याच्या निर्णयाविरोधात ओवेसी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.