Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : भारत जोडो यात्रा , काँग्रेसचे ट्विटर हँडल तात्पुरते ब्लॉक करण्याचे आदेश

Spread the love

बेंगळुरू : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ला मोठा झटका बसला आहे. कर्नाटक न्यायालयाने ‘भारत जोडो यात्रा’ आणि कर्नाटक काँग्रेसचे ट्विटर हँडल तात्पुरते ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. एमआरटी म्युझिकचे व्यवस्थापन पाहणारे एम नवीन कुमार यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. ज्यात त्यांनी कन्नड चित्रपट KGF-2 चे संगीत वापरल्याचा आरोप करत राहुल गांधींसह तीन काँग्रेस नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली. संगीताचा वापर करून त्या लोकांनी कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


बेंगळुरूमधील यशवंतपूर पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये, संगीत कंपनीच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यात्रेचे दोन व्हिडिओ ट्विट केले होते, ज्यामध्ये KGF-2 ची लोकप्रिय गाणी परवानगीशिवाय वापरली गेली होती.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर ट्विट करून काँग्रेसने असे म्हटले आहे की, बंगळुरू न्यायालयाने काँग्रेसचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक करण्याचे आदेश दिले असल्याचे मीडियावरून समजले आहे. आम्हाला कारवाईची माहिती देण्यात आली नाही, आम्ही न्यायालयात हजर झालो नाही, तसेच आदेशाची प्रतही आम्हाला मिळाली नाही आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत.


हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारत जोडो यात्रेचा  मुक्काम सध्या  महाराष्ट्र आहे जिथे आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली चालत असलेल्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सामील होऊ शकतात. काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून काँग्रेसची यात्राही याच भागातून जाणार असल्याचे शिवसेना नेते सचिन अहिर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान काँग्रेसने शेअर केलेल्या वेळापत्रकानुसार, राहुल गांधी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात दोन सभांना संबोधित करतील. पहिला मेळावा नांदेड जिल्ह्यात १० नोव्हेंबरला तर दुसरा मेळावा १८ नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे होणार आहे. ही यात्रा १४ दिवसांत राज्यातील १५ विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. या दरम्यान ३८२ किमी अंतर कापून २० नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात प्रवेश करेल. या कार्यक्रमानुसार नांदेड जिल्ह्यात चार दिवस पायी पदयात्रा होणार आहे. ही यात्रा ११ नोव्हेंबरला हिंगोली, १५ नोव्हेंबरला वाशिम, १६ नोव्हेंबरला अकोला आणि १८ नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातून जाणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!