Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके ५३४७१ मतांनी विजयी

Spread the love

अंधेरी पूर्व (Andheri Bypoll Result 2022) विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेऱ्यांपर्यंत लटके या आघडीवर होत्या. ऋतुजा लटके ५३४७१ मतांनी विजयी झाल्या आहेत.

हा माझा विजय नसून माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे त्यांनी केलेल्या कामाची परतफेड जनतेने केलीये अशी प्रतिक्रिया विजयानंतर ऋतुजा लटके यांनी दिली आहे. त्यांच्यानंतर सर्वाधिक मते नोटाला १२७७६ मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार बाळा नडार यांना १५०६ मते मिळाली आहेत.

दरम्यान, ऋतुजा लटके या मोठ्या परकारने निवडून येतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला होता. ऋतुजा लटके यांनी निवडून येऊन साहेबांचे राहिलेल काम पूर्ण करावे असे मत दिवंगत रमेश लटके यांच्या वडीलांनी व्यक्त केले. तर ऋतुजा लटकेंनी लोकांची काम करावी आणि माझ्या मुलाचे नाव करावे असे मत रमेश लटकें यांच्या आई यांनी व्यक्त केले होते. यावेळी रमेश लटकेंच्या आई वडिल ते दोघेही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘166 अंधेरी पूर्व’ या मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासूनसुरुवात झाली होती दिवंगत ही मतमोजणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली महानगर पालिकेच्या शाळेमध्ये सुरु होती. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार मतमोजणीच्या अनुषंगाने विविध स्तरीय बाबींचे सुयोग्य नियोजन करण्यात आले.

३ नोव्हेंबरला झाले होते मतदान

१६६ – अंधेरी पूर्व’ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले. २ लाख ७ हजार ५०२ मतदारांपैकी ८४ हजार १६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!