Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : भाजपने मला ऑफर दिली, गुजरात निवडणूक लढवू नका : अरविंद केजरीवाल

Spread the love

अहमदाबाद: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. भाजपने मला ऑफर दिली, गुजरात निवडणूक लढवू नका, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया सोडू, असे केजरीवाल म्हणाले. सीबीआयने मनीष सिसोदिया यांची चौकशी कमी केली आणि केजरीवालांची बाजू सोडा, ते तुम्हाला मुख्यमंत्री करतील, असे सांगितले. सीबीआयने हे सिसोदिया यांना वारंवार सांगितले.


IndiaNewsUpdate : भाजप सरकारवर तीव्र हल्ला करताना, अरविंद केजरीवाल म्हणाले की या आठवड्यात पूल कोसळल्याने राज्यातील “भ्रष्टाचाराची व्याप्ती” दिसून येते त्यामुळे  लोक पुढच्या महिन्यात यांना हाकलून देतील. “खऱ्या गुन्हेगारांची सुटका केली जात आहे. पुलाच्या नूतनीकरणाचे कंत्राट एका घड्याळ बनवणाऱ्या कंपनीला देण्यात आले होते. त्यांचा  मालक फरार आहे. तक्रारीत त्याचे नाव का नमूद करण्यात आलेले नाही ? ” असा प्रश्नही त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना केला.

दिल्लीच्या वाढत्या प्रदूषणावर केजरीवाल म्हणाले की, हो मी मान्य करतो की राज्यात प्रदूषण वाढले आहे. पण त्यात थोडी सुधारणाही झाली आहे. गुजरात निवडणुकीवर बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, आता गुजरातनेही परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या गलथान कारभारावर जनता नाराज आहे, २७ वर्षात भाजपने महागाई दिली आहे. अशा परिस्थितीत यावेळी गुजरातची जनता महागाईसारख्या मुद्द्यांवर ‘आप’ला मत देईल.

IndiaNewsUpdate


#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

#CurrentNewsUpdate | #ImportantNews
http://mahanayakonline.com

News Update on one click
http://mahanayakonline.com 

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!