Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : शिवसेना नेते सुधीर सुरी यांचा गोळीबारात मृत्यू , पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या…

Spread the love

(Amritsar) अम्रीत्सरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी (Shiv Sena leader Sudhir Suri ) यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने भरदिवसा गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यामध्ये सुधीर सुरी गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सुधीर सुरी अम्रीत्सरमधील मजीठा रोडवरील एका मंदिराबाहेर निदर्शने करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. या मंदिरातील काही देवीदेवतांच्या मूर्तींची विटंबना झाल्याच्या वृत्तामुळे ते या मंदिराबाहेर निदर्शने करत होते. त्याचवेळी गर्दीमधील एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला होता. यामध्ये सुधीर हे सुरी गंभीर जखमी झाले होते. सुरी यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. यांच्या मृत्यूनंतर स्थानिक शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली असून आरोपीकडून बंदूक जप्त केली आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्त म्हणाले की, ‘सुधीर सूरी गोपाळ मंदिराच्या परिसरात निदर्शन करत होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून त्याच्याकडून बंदूक जप्त केले आहे.’ पोलीस महासंकलाक गौरव यादव म्हणाले की, सुधीर सुरी यांना गोळी मारणारा संदीप सिंह याला घटनास्थळावरुन अटक केली आहे. चौकशीमध्ये अनेक घटनेचा उलगडा होईल. पंजाबमधील जनतेला शांततेचे आवाहन करतोय. सोशल मीडियावरील अफवाकडे लक्ष देऊ नका.

पंजाबमधील अश्वनी चोप्रा शिवसेना नेते यांच्यावरही गुरुवारी प्राणघातक हल्ला झाला होता. अश्वनी चोप्रा यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर सायकलवरुन आल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या माहिन्यात पंजाबमध्ये एसटीएफ आणि अमृतसर पोलिसांनी एकत्र कारवाई करत चार आरोपींना अटक केली होती. यावेळी चौकशीदरम्यान आरोपींनी खुलासा केला होता. मागील काही दिवसांपासून सुधीर सुरी यांच्यावर हल्ल्याची योजना करण्यात येत होती. दिवाळीमध्येच त्यांच्यावर हल्ला करण्यात येणार होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!