Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#ElectionUpdate | दिल्ली महापालिकेचे निवडणूक वेळापत्र आज जाहीर

Spread the love

दिल्ली महापालिकेचे निवडणूक वेळापत्र आज जाहीर करण्यात आले आहे. चार डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर सात डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दिल्ली महापालिकेची मुदत एप्रिलमध्ये संपली होती. गुजरात आणि दिल्ली महापालिका जाहीर झाल्याने केजरीवाल यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

(Delhi Municipal Corporation) वेळापत्रक :
– सूचना – ७ नोव्हेंबर
– अर्ज करण्याची अंतिम तारीख – १४ नोव्हेंबर
– अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – १९ नोव्हेंबर
– मतदान- ४ डिसेंबर
– मतमोजणी – ७ डिसेंबर

दिल्ली महापालिकेची मुदत एप्रिल महिन्यातच संपली होती…

दिल्लीत आधी तीन महापालिका होत्या, केंद्र सरकारने त्या एकत्रित करुन एकच महापालिका केली आहे. त्यामुळे नव्या वॉर्ड रचनेसाठी या निवडणुका लांबल्याचे वृत्त आहे . तीन महापालिकांमध्ये मिळून आधी २७२ वॉर्ड होते, नव्या एकत्रित महापालिकेत ही संख्या कमी होऊन २५० वॉर्ड इतकी करण्यात आलीय. दिल्लीत प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असतानाच आता महापालिका निवडणुकांमुळे ही लढाई आणखी तीव्र होईल हे नक्की.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!