Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Cyrus Mistry । सायरस मिस्त्री यांच्या अपघाताचे अधिकृत कारण…

Spread the love

पालघर नजीक चारोटी येथील ब्रिजवर टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा सप्टेंबर महिन्यात अपघाती मृत्यू झाला. हा अपघात घडला तेव्हा सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारमध्ये एकूण चारजण होते. यापैकी सायरस मिस्त्री आणि जहांगीर दिनशा पंडोले यांचा मृत्यू झाला होता. तर दारियस पंडोले आणि डॉ. अनाहिता पंडोले यांना गंभीर दुखापत झाली होती. अनेक दिवसांच्या उपचारानंतर दारिसय पंडोले यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यानंतर पोलिसांनी दारियस पंडोले यांचा जबाब नोंदवला असून या अपघाताचे अधिकृत कारण समाेर आले आहे.

गेल्याच आठवड्यात दारिसय पंडोले यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. पोलिसांनी मंगळवारी त्यांच्या दक्षिण मुंबईतील घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला होता. दारियस पंडोले यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, त्यांची पत्नी गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. अनाहिता पंडोले या रस्त्यावरील तिसऱ्या लेनमधून मर्सिडीज कार चालवत होत्या. सूर्या नदीवरील पुलावरील रस्ता अरुंद असल्याने त्यांनी गाडी तिसऱ्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये टाकली पाहिजे होती. परंतु, अनाहिता पंडोले यांनी वेळेत गाडी दुसऱ्या लेनमध्ये न नेल्याने सायरस मिस्त्री यांची कार दुभाजकावर आदळली, अशी माहिती दारियस पंडोले यांनी पोलिसांना दिली.

आता पोलीस अनाहिता पडोले यांचाही जबाब नोंदवणार आहेत. पोलीस दारिसय पंडोले यांचा जबाब नोंदवायला गेले तेव्हा त्यांना बराच वेळ लागला. कारण अपघातावेळी नेमके काय घडले, हे आठवण्यासाठी दारियस पंडोले यांना वेळ लागत होता. मात्र, सद्यस्थिती पाहता अनाहिता पंडोले यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळेच हा अपघात घडल्याचे दिसत आहे. मात्र, पोलिसांनी मर्सिडीज कंपनीकडून याबाबतचा अहवाल मागवला आहे. त्यानंतर पोलीस अनाहित पंडोले यांच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवण्याचा गुन्हा नोंदवायला की नाही, याबाबत निर्णय घेतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!