Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती…

Spread the love

मुंबई । राजू झनके  : प्रदेशाध्यक्षा उमा खापरे विधानपरिषदेवर निवडून गेल्यानंतर त्यांच्या जागेवर भाजपने आक्रमक चेहरा असलेल्या चित्रा  वाघ यांची भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. चित्रा वाघ यांच्या कार्याची दखल घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली.


आक्रमक असलेल्या चित्रा वाघ या मूळच्या राष्ट्रवादीच्या, फडणवीस सरकारच्या मागील कार्यकाळात भाजपमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक आजीमाजी आमदारांनी व पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता . या प्रवेशकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष असलेल्या चित्र वाघ यांनीदेखील भाजपची वाट धरली होती भाजपने त्यांच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची दिल्यानंतर महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी मागील तीन चार वर्षात आक्रमक भूमिका घेऊन काम केले .तत्कालीन वनमंत्री अनिल राठोड यांच्या कथित बंजारा युवतीचे मृत्यू प्रकरण वाघ यांनी चांगलेच लावून धरल्यानंतर राठोड याना आपले मंत्रिपद गमवावे लागले होते.

भाजपा प्रदेश कार्यालयात बावनकुळे यांनी चित्रा वाघ यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील तसेच मावळत्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. उमा खापरे उपस्थित होते.चंद्रशेखर बावनकुळे यांनी चित्रा वाघ यांना नव्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा महिला मोर्चा संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होईल तसेच विविध पक्षांमधील महिला कार्यकर्त्या भाजपाशी जोडल्या जातील, असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला .

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. ते राज्यातील महिलापर्यंत पोहचविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यावर आपण भर देऊ अशी प्रतिक्रिया वाघ यांनी सदर प्रसंगी व्यक्त केली .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!