Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliNewsUpdate : हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा, राष्ट्रवादीचा भव्य आक्रोश मोर्चा…

Spread the love

हिंगोली/ प्रभाकर नागरे : हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा परतीच्या पावसाने चांगलेच डबघाईस आणले आहे. हातातले येणार पीक हे अतिवृष्टीने गेल्यानेमुळे जिल्ह्यातील शेतकरी हातबल झाला आहे. त्यातच कसेबसे राहिलेले सोयाबीन हे परतीच्या पावसाने पुन्हा हिरावून नेले  त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हा मोठ्या संकटात सापडला आणि अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करा , पिक विमा द्या अशा विविध मागण्या संदर्भात आज राष्ट्रवादीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.


यावेळी ढोल ताशा वाजवत लाखोच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरलेले दिसले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील
जन आक्रोश शेतकरी मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने मार्गदर्शक माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, तसेच बसमत चे राजूभाऊ नवघरे आमदार ,व जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण, पूर्ण जिल्ह्याचे शेतकरी बांधव राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी महिला जिल्हाध्यक्षा व सर्व माजी नगरसेवक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

हा मोर्चा रेस्ट हाऊस पासून ते कलेक्टर ऑफिस या पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी आमच्या मागण्या पूर्ण करा
शेतकऱ्यांना पिकं विमा मिळालाच पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर करा… अशा घोषणा बाजी करत जिल्हा अधिकारी कार्यालय येथे मोर्चा नेण्यात आला आणि जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!