Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारची मोठी भेट …

Spread the love

राजू झनके  । मुंबई : नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतगर्त प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. आज एकाच वेळेला राज्यातल्या ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे अडीच हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. अशाप्रकारे एकाच वेळेला थेट खात्यात रक्कम जमा करणार महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे  एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.


Maharashtra News Update : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याने खचून जाऊ नये, सरकार तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सध्या राज्यात परतीच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याने खचून न जाता धैर्याने संकटाला सामोरे जा, शासन तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान शेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रह आधारीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतानाच त्याची भरपाई ऑटोपायलट मोडच्या माध्यमातून देण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .

शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळी पूर्वी लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश विभागाला दिले होते. त्यानुसार विभागाने तातडीने कार्यवाही केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांचे अभिनंदन केले. शेतकरी केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले आहेत. एनडीआरएफच्या दुप्पट निधी देणे, नुकसान भरपाईसाठी दोनऐवजी तीन हेक्टरची मर्यादा करणे, सततच्या पावसात निकषता न बसणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणे, रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना मान्यता देऊन जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणून शेतकरी बांधवांना दिलासा देणारे निर्णय या शासनाने घेतले आहेत.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

Maharashtra News Update : यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, या शासनाने पहिल्याच बैठकीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही केली. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्यासाठी यावेळेस पहिल्यांदाच एका क्लिकवर निधी जमा करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे कालपर्यंत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


 

#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

 

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

For current updates join

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide

https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

आपलं सरकार

Click to listen highlighted text!