Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : भाजपच्या माघारीनंतरचे कवित्व , बघा कोण काय म्हणाले ?

Spread the love

मुंबई : पुढील महिन्यात ३ नोव्हेंबरला होणाऱ्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज संपण्याच्या काही तास आधी भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचे नाव मागे घेतले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्षाने आपला उमेदवार उभा करू नये, असे आवाहन केले होते. त्यानंतर भाजपने हा निर्णय घेतला. आता यावरून मोठ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.


यावर आपली प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या या निर्णयावर शंका उपस्थित करून शरद पवार , भाजप , शिंदे आणि राज ठाकरे यांनी संगनमताने मुद्दाम पटेल यांचा अर्ज मागे घेतल्याचा आरोप केला आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे यांनी भाजपने आपला उमेदवार मागे घेतला नसता तरी प्रचंड मताधिक्क्याने आमच्याच उमेदवार विजयी झाल्या असत्या असा दावा केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

दरम्यान विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि , स्व. रमेश लटके आमचे सहकारी होते. बरीच वर्षे त्यांनी आमच्यासोबत काम केले  होते . ज्यावेळी दिवंगत आमदाराच्या घरातील कुणी निवडणुकीत उभे  असते , त्यावेळी उमेदवार न देणे  ही आपली परंपरा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे  आवाहन केले . आमचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही मला पत्र लिहिले . त्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. सगळ्याचा परिपाक म्हणून शेवटी राजकीय संस्कृती जपण्यासाठी भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला.

“पराभवाच्या भीतीतून अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला, असे  ज्यांना वाटतेय, त्यांना सांगू इच्छितो, मुंबई महापालिका निवडणूक जवळच आहे. त्या निवडणुकीत कोण हरते  आणि कोण जिंकते  हे त्यांना कळेलच…”, असेही शिंदे म्हणाले.

फडणवीस काय म्हणाले?

यावर बोलताना उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि , अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली नसती तर आमच्या उमेदवाराचा नक्की विजय झाला असता. पण राज्याची राजकीय संस्कृती आहे. दिवंगत नेत्याच्या जागी त्याच्या परिवारातील कुणी उभे राहत असेल तर अशा जागांवर शक्यतो उमेदवार न देण्याची परंपरा आहे. आर आर पाटील, पतंगराव कदम गेले त्यावेळी भाजपने उमेदवार दिलेला नव्हता. आताही ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विनंतीवरुन भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

आमदार जयश्री जाधव

मुंबईतील अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेताना संस्कृती जपल्याचा बडेजाव मिरवणाऱ्या भाजपला कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीत ही संस्कृती जपल्याची भावना का सूचली नाही अशी विचारणा काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनी सोमवारी केली.

आमदार जाधव पुढे म्हणाल्या, पती निधनानंतर पत्नीला बिनविरोध करण्याची पध्दत आपल्याकडे आहे. शिवाय ही निवडणूक अडीच वर्षासाठीच होणार होती. तरीही भाजपने ही निवडणूक जनतेवर लादली. परंतू कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेच्या बळावर यश मिळवून दाखवले. आणि आता अंधेरी पूर्वच्या निवडणुकीत भाजप संस्कृतीची भाषा करत आहे. त्यांचा यापूर्वीच्या निवडणुकीतला अनुभव तसा नाही.

त्यावेळी या जयश्री जाधव यांना  बिनविरोध निवडून देवून राज्याला चांगला संदेश देवू या असे आवाहन काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनीही केले होते. परंतु भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जयश्री जाधव यांच्या विरोधात  सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली. प्रचंड राजकीय व आर्थिक ताकद पणाला लावली.परंतु भाजपच्या उमेदवाराचा पराभव करीत जयश्री जाधव या निवडणुकीत विजयी झाल्या. 

शरद पवार काय म्हणाले ?

दरम्यान भाजपच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कि ,  “अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल याची मला खात्री होती. अखेर आज भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली. हा निर्णय स्वागतार्ह आहे. याचा मला आनंद आहे. एकदा त्यांनी माघार घेतली आहे, त्यावर शंका किंवा इतर काही बोलणे योग्य नाही” .

“मुळात ही पोटनिवडणूक आहे. रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे ही निवडणूक होत आहे. त्यांच्या पत्नीला जागा मिळणार अशी शक्यता होती. आधी निर्णय घेतला असता तर फायदा झाला असता का, तर निर्णय आता झाला किंवा आधी झाला, यापेक्षा निर्णय घेतला हे महत्त्वाचे आहे,” असेही शरद पवार म्हणाले.

भाजपला पराभव दिसत होता : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र भाजपच्या निर्णयावर प्रतिक्रिया शरद पवार यांच्या पुढे जाऊन प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच ऋतुजा लटके उभ्या राहू नये म्हणून प्रयत्न सुरू होते. त्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये, यासाठी अनेक अडथळे आणले गेले. शेवटी त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागली. या सर्वांमुळे अंधेरीत ऋतुजा लटके यांच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली होती. भाजपाला माहिती होते की, इथे आपला पराभव होणार आहे. पराभवाची खात्री झाल्यानंतर भाजपाने निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!