Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliCrimeUpdate : मोटार सायकल चोरांची टोळी गजाआड, १४ मोटार सायकल जप्त

Spread the love

हिंगोली / प्रभाकर नागरे : हिंगोली शहर व जिल्हयात मागील काही महीण्यापासुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे घडले होते . नमुद मोटार सायकल चोरी करणारी टोळी पकडून  मोटार सायकल चोरीचे गुन्हयांवर आळा घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षक हिंगोली  एम . राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते .


स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली चे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांचे मार्गदर्शनात तपास पथकाने मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाचा बारकाईने अभ्यास करून गोपनिय माहितीच्या आधारे हिंगोली व नांदेड जिल्हयातील आरोपी नामे 1 ) मो . एजाज मो . अकबर , वय 33 वर्ष , रा . गंगानगर , देगलुरनाका , नांदेड , ह.मु. आझम कॉलनी , हिंगोली व 2 ) शेख हकिम शेख कासीम , वय 32 वर्ष , रा . पलटन , हिंगोली यांना निष्पन्न करून नमुद आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केली असता त्यांनी हिंगोली , नांदेड , परभणी जिल्हयातील अनेक मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली.

विविध गुन्ह्यातील ७ लाखाचा मुद्देमाल जप्त

सदर आरोपीतांकडुन विविध कंपणीच्या 14 मोटार सायकली एकुण रू . 7,00,000 / – सात लाख रू . चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . तसेच नांदेड , हिंगोली व परभणी जिल्हयातील खालील प्रमाणे गुन्हे उघड करण्यात आले आहे . 1 ) पो.स्टे . हिंगोली शहर गुरनं . 394 / 2022 कलम 379 भादवी 2 ) पो.स्टे . औंढा नागनाथ गुरनं 265 / 2022 कलम 379 भादवी 3 ) पो.स्टे . वसमत शहर गुरंन 310 / 2022 कलम 379 भादवी 4 ) पो.स्टे . कळमनुरी गुरनं . 70 / 2020 कलम 379 भादवी 5 ) पो.स्टे . जिंतुर जि . परभणी गुरनं . 398 / 2022 कलम 379 भादवी 6 ) पो.स्टे . इतवारा जि . नांदेड गुरनं . 279 / 2022 कलम 379 भादवी तसेच नमुद आरोपींनी नांदेड जिल्हयातील पो.स्टे . भोकर व इतवारा परीसरातही मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याचे सांगीतले असुन तसेच आरोपींवर नांदेड जिल्हयात घरफोडी व मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असुन नमुद आरोपीतांकडुन अजुनही मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे .

सदरची कार्यवाही  पोलीस अधीक्षक  एम . राकेश कलासागर  अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री . उदय खंडेराय , सपोनि सुनिल गोपीनवार सपोनि . राजेश मलपिलू , सपोनि शिवसांब घेवारे , पोलीस अंमलदार भगवान आडे , शेख शकील नितीन गोरे , विठठल कोळेकर , राजु ठाकुर , ज्ञानेश्वर सावळे , विठठल काळे , आकाश टापरे , किशोर सांवत , तुषार ठाकरे , सुमित टाले , जयप्रकाश झाडे , पारू कोटमीते , रवीना घुमनर , सुनील अंभोरे , संभाजी लेकुळे , किशोर कातकडे , यांनी केली .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!