Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : धनुष्य बाणासाठी उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद …

Spread the love

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मूळ शिवसेना कोणाची आणि पक्षाचे अधिकृत चिन्ह कोणाचे यावरून निवडणूक आयोगासमोर ठाकरे विरुद्ध शिंदे गट यांची सुनावणी चालू आहे. आजच्या सुनावणीदरम्यान  प्रतिस्पर्धी एकनाथ शिंदे गटाने पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर दावा करत निवडणूक आयोगाशी संपर्क साधल्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने आपले म्हणणे निवडणूक आयोगाकडे सादर करीत जोरदार युक्तिवाद केला.


ठाकरे गटाचे वकील एस जैन म्हणाले कि , “काल आम्ही आमचे प्राथमिक उत्तर दाखल केले आणि आजही आम्ही आमचे सविस्तर उत्तर दाखल केले. या उत्तरात आम्ही आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणींच्या शपथ पत्रासह अडीच लाखाहून अधिक प्रतिज्ञापत्रे वेळेत सादर केले आहेत.

शुक्रवारी शिंदे गटाने येत्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी चिन्ह वाटप करण्यात यावे यासाठी निवेदन दिले होते. यानंतर आयोगाने शनिवारी दुपारी २ वाजेची वेळ देत ठाकरे गटाकडून उत्तर मागितले होते.


दरम्यान ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाने आमदार रमेश लटके यांच्या विधवा पत्नी रुतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर  शिंदे गटाचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने बृहन्मुंबई महापालिकेतील नगरसेवक मुरजी पटेल यांना तिकीट दिले आहे. जूनमध्ये शिंदे आणि भाजपने एमव्हीए सरकारचा पाडाव केल्यानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ही पहिलीच निवडणूक आहे आणि राजकीय विश्लेषकांनी ही शिंदे आणि ठाकरे यांच्या “खरी शिवसेना” असल्याच्या दाव्यांचा निपटारा करण्यासाठी हि निवडणूक निर्णायक असेल असे म्हटले आहे.

ठाकरे गटाचा युक्तिवाद काय  होता ?

१. अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदेंचा उमेदवार नाही, मग चिन्ह का मागताय?
२. कागदपत्रं सादर होत नाहीत, तोपर्यंत तातडीची सुनावणी करु नये
३. चिन्हाबाबतचा दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही
४. विहित नमुन्यांमध्ये कागदपत्र सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मिळावा

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरीत सुनावणीची विनंती केली होती. मात्र जोपर्यंत सर्व कागदपत्रं सादर होत नाहीत, तोपर्यंत सुनावणी करु नये, अशी विनंती ठाकरेंतर्फे करण्यात आली आहे. केवळ भाजपला फायदा व्हावा म्हणून एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले, परंतु तात्काळ सुनावणीची गरज नसल्याचे ठाकरेंचे म्हणणे आहे.

असे पद शिवसेनेच्या घटनेत नाही…

शिवसेनेच्या युक्तिवादानुसार एकनाथ शिंदेंनी स्वतःला मुख्य नेता पदावर नेमलं आहे, असे पद शिवसेनेच्या घटनेत नाही. शिवाय त्यांनी पक्षप्रमुख पदावर चॅलेंज केलेलं नाही, त्यामुळे चिन्हाबाबतचा दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही. विधानसभेतील १४ आमदार, विधानपरिषदेतील १२ आमदार, लोकसभेतील सात खासदार, राज्यसभेतील ३ खासदार, राष्ट्रीय कार्यकारिणीतील १६० सदस्य, १८ राज्य प्रभारी, १९२ जिल्हाप्रमुख, ६०० उपजिल्हाप्रमुख अशी आकडेवारी आपल्यासोबत आहेत.


पक्षाच्या अधिकृत चिन्हाबाबत निर्णयासाठी आणीबाणीची किंवा तातडीची स्थिती नाही. अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे यांच्या गटाचा उमेदवार नाही, मग जैसे थे स्थिती ठेवायला काय हरकत आहे? म्हणजेच अंतिम निर्णय होईपर्यंत धनुष्यबाण आमच्याकडे राहावे, आमच्या चिन्हाचा गैरवापर होऊ नये. १४ ऑक्टोबर ही अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.

शेवटी ठाकरे यांचे वकील म्हणाले कि , निवडणूक आयोगाची टीम आमची तयारी पाहू शकते. अडीच लाख पदाधिकारी आणि १० लाख प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे दिल्लीत आमच्याकडे तयार आहेत. केवळ विहित नमुन्यांमध्ये कागदपत्र सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मिळावा.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!