Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliNewsUpdate : हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची मोठी कार्यवाही , ६ घरफोड्यांची उकल …

Spread the love

हिंगोली /प्रभाकर नांगरे : मागील काही महीण्यापासुन हिंगोली जिल्हयातील आखाडा बाळापुर व वसमत पोलीस स्टेशन अंतर्गत सिमावर्ती भागात तसेच सदर परीसराला लागून असलेले नांदेड व यवतमाळ जिल्हयातील सिमावर्ती भागात घरफोडीचे अनेक गुन्हे घडले होते . सदर घरफोडी करणारे टोळीतील आरोपींना पकडण्याकरीता पोलीस अधीक्षक  हिंगोली यांचे आदेशाने व मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथील पथक सतत प्रयत्न करत होते.


या  टोळीला पकडण्याकरिता  नांदेड व यवतमाळ येथील पोलीस पथकही प्रयत्न करत होते . नमुद टोळीचे गुन्हयाचे कृत्य वाढतच होते त्यांना पकडुन गुन्हयांना आळा घालण्याचे आवाहन पोलीसांसमोर होते . स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल हिंगोली यांनी मागील काही दिवसापासून सतत प्रयत्न करून समुद्र चोरीच्या घटनास्थळांना भेट देऊन त्यांचा अभ्यास करून असे गुन्हे करणाऱ्या आरो पी बाबत माहीती काढली . दरम्यान सायबर सेल हिंगोली यांनी डम्प बाटा , सी.बी.आर. याचा अभ्यास करून तांत्रिक  विशलेषण  व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने सदरचे गुन्हे हे सोनाजी चंपती शिंदे रा.पास्त्रीवस्ती टोकाई , बागलपार्ती याने व त्याचे नांदेड जिल्हयातील हिमायतनगर व परीसरात राहणारे साथीदारांच्या मदतीने केल्याचे तपासात आढळून आले.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बागलपार्टी पारधीवस्ती टोकाई वस्ती येथुन सोनाजी चंपती शिंदे वय 25 वर्ष राटोकाई वस्ती बागलपार्डी ता.वसमत यास ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल तपास करता त्याने त्याचे साथीदार नामे 1.जाकी बावाजी चव्हाण रा.सोनारी ता . हिमायतनगर जि.नांदेड . 2 . मार्गीलाल श्रीरंग राठोड उर्फे भोसले राहिमायतनगर जि.नांदेड 3 विकास श्रीरंग राठोड उर्फ चव्हाण राहिमायतनगर जि.नांदेड 4 . निलेश बबरसिंग राठोड 5.दता मार्गीलाल राठोड उर्फ मोसले रानागेशवाडी ता . हिमायतनगर नांदेड 6 सतीष गणपत राठोड रा . हिमायतनगर जि.नांदेड 7 बाबुलाल भावजी चव्हाण राहिमायतनगर जि.नांदेड यांचे सोबत मिळून हिंगोली जिल्हयातील पो.स्टे . आखाडा बाळापुर व वसमत ग्रामीण हददीमध्ये खालील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

हे गुन्हे आले उघडकीस …

1. पो.स्टे . आ . बाळापूर गुरन 288 / 2022 कलम 394,511,34 भा.द.वी. 2. पो.स्टे . आ . बाळापूर गुरन 409 / 2021 कलम 457,380 भा.द.वी. 3.पो.स्टे . आ . बाळापूर गुरन 185 / 2022 कलम 394,336,34 भा.द.वी. 4. पो.स्टे . आ . बाळापूर गुरन 189 / 2022 कलम 457,380 भा.द.वी. 5. पो.स्टे . वसमत ग्रा . गुरन 180 / 2022 कलम 394,34 भा.द.वी. 6.पो.स्टे . आ . वसमत ग्रा . गुरन 233 / 2021 कलम 457,380 भा.द.वी. आरोपीकडे अधिक तपास करता त्याने नमुद गुन्हयातील चोरलेले नगदी रूपये व दागीने त्याचे इतर साथिदारांसोबत वाटुन घेतले असुन त्यांचे हिश्याला आलेले वर नमुद गुन्हयातील 31 ग्रॅम सोन्याचे दागीने ज्यात सोन्याचे अंगठया कानातले रिंग , सोन्याचे पेंढाल , मणी इ . दागीने ज्यांची किंमत 1 लाख 3 हजार रूपये सोबत गुन्हयात आरोपीने वापरलेले अॅन्ड्राईड मोबाईल किं . 10,000 रु . एक बजाज कंपनी डिस्ककव्हर मो.सा. कि . 50,000 रू . असा एकुण 1,63,000 रू चा मुद्देमाल आरोपी कडुन जप्त करण्यात आला आहे .

या गुन्हयातील ईतर आरोपींचा शोध सुरू आहे . सदरची कार्यवाही  पोलीस अधीक्षक  एम . राकेश कलासागर ,  अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो . नि . उदय खंडेराय , सपोनि सुनिल गोपीनवार , सपोनि राजेश मलपिलू , पोउपनि भाग्यश्री कांबळे , पोलीस अमलदार संभाजी लेकुळे , भगवान आडे , सुनिल अंभोरे , शेख शकील नितीन गोरे , पारु कुडमेथा विशाल घोळवे राजु ठाकुर , शंकर ठोंबरे , ज्ञानेश्वर सावळे , विठठल काळे , आकाश टापरे , रविना घूमनर किशोर सांवत ज्ञानेश्वर पायघन चालक प्रशांत वाघमारे सुमित टाले , रोहीत मुदीराज , जयप्रकाश झाडे , आदींनी सहकार्य केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!