Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

DhammChkrapravartanDinSpecial : “एक वही एक पेन” अभियानात सामील होऊन साजरा करा धम्म चक्र प्रवर्तन दिन …

Spread the love

मुंबई  : महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिलेला धर्मातराचा सोहळा धम्म चक्र प्रवर्तन दिन (अशोक विजया दशमी) म्हणून देशभरात  साजरा केला जात असून त्यांनी जनतेला दिलेला शैक्षणिक संदेश लक्षात घेता या दिवशी त्यांना शैक्षणिक अभिवादन केले जाणार असल्याची माहिती एक वही एक पेन अभियानच्या वतीने देण्यात आली आहे.


डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी-१४ आक्टोबर १९५६ रोजी अशोक विजया दशमी (दसरा)दिनी आपल्या लाखो बांधवांना नागपूर येथे. बौध्द धम्माची दीक्षा दिली.देशाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक  धर्मातर  होते.या घटनेच्या प्रित्यर्थ नागपूर येथे दीक्षाभूमी उभारण्यात आली असून या ठिकाणी अशोक विजया दशमी दिनी आजही लाखो लोक नतमस्तक होण्यासाठी येत असतात.यावर्षी-५ सप्टेंबर रोजी देखील लाखो लोक येणार आहेत.शिवाय राज्यात व देशातदेखील हा धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळा मोठ्या हर्षोल्हासात साजरा होत आहे.

धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळा  आपण अत्यंत हर्षोल्हासात तसेच विविध प्रबोधनकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून हा सोहळा बुध्द विहार व सार्वजनिक ठिकाणी    साजरा करतो .आपल्या घरी गोडधोड बनवून तोंड गोड करतो. या सर्व कार्यक्रमासोबतच सोबतच शैक्षणिक सह विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा केला जाणार आहे.

अशोक विजयादशमीचा  सोहळा साजरा करीत असताना राज्यातील बांधव आपल्या घरात बनवलेले गोड धोड पदार्थ समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांनाही देऊन  हा आनंद द्विगुणीत करणार आहेत. बुध्दविहारातील तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरूषांना हारफुलांसोबतच किमान एक वही एक पेन आपल्या मुलांची जुनी पुस्तके व शालेय साहीत्य  ठेवून अभिवादन करणार आहेत .समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शक्यतो नवीन कपडे दिली जाणार आहेत  वापरात नसलेले मोबाईल,आयपॅड ,  पीसी किंवा तत्सम साहीत्य या वस्तू समाजातील गरजू विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत..

स्थानिक बुध्दविहार किंवा  डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव  समितीला धम्मदान देवून यंदाचा धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळा मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जाणार असल्याची माहिती एक वही एक पेन अभियानचे प्रमुख ज्येष्ठ पत्रकार राजू झनके यांनी दिली आहे. या एक  वही एक पेन अभियानाला सहकार्य करण्यासाठी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!