Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांना अपघात…

Spread the love

औरंगाबाद : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या गटातील वाहनांना झालेल्या अपघातात १५ ते गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या अपघातात कुणीही जखमी झालं नाही.


शिवसेनेतून बंडखोरी करीत भाजपशी हातमिळवणी करून  मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्यासमोर दसरा मेळाव्याचा निमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शन करण्याचे आव्हान आहे . या गटाला उशिरा येऊन मिळालेले अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातून २५ ते ३० हजार कार्यकर्त्यांना मुंबईला नेण्याचा संकल्प केला आहे .

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली १५०० हून अधिक चारचाकी वाहनं जालना येथून निघाली आहेत. दरम्यान, औरंगाबादच्या दौलताबादजवळील समृद्धी महामार्गवरून जात असतानाच एका चालकाने अचानक ब्रेक दाबल्यानंतर मागून भरधाव वेगाने येणारी नऊ वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या मेळाव्यासाठी जालन्यात खोतकर यांच्याकडून जय्यत  तयारी करण्यात आली आहे. जिल्हाभरातून जमलेले सुमारे २५ ते ३० हजार शिंदे गटातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मुंबईकडे रवाना होत आहेत.त्या पार्श्वभूमीवर मेळाव्यासाठी निघालेल्या  शिवसैनिकांसाठी पुरी भाजीचे पॅकेट तयार करण्याचे काम दोन दिवसांपासून चालू आहे. याच दसरा मेळाव्यासाठी अर्जुन खोतकर हे आपल्या समर्थकांसह मुंबईकडे निघाले होते. मात्र दौलताबादजवळ आल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील वाहनांना हा अपघात झाला.

आमदार अंबादास दानवे यांची टीका

दरम्यान  समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला नसतानाही शिंदे गटाकडून नियमांचे उल्लंघन करून या रस्त्यावरून वाहनं नेण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी म्हटले आहे कि , समृद्धी महामार्ग अजूनही सर्वसामान्यांसाठी वाहतुकीस खुला झाला नाही. या महामार्गाचे अनेक काम अजूनही अपूर्ण आहे. सर्वसामान्य व्यक्ती या महामार्गावरून गेल्यास त्याला हटकले जाते. परंतु सत्तेचा दुरुपयोग करून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी बेकायदेशीर वाहतूक करण्यात आली आहे. त्यामुळे या महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या लोकांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

 


 

MaharshtraNewsUpdate : भारतीय बौद्ध  महासभेचे नागपुरात प्रथमच राष्ट्रीय अधिवेशन : भीमराव आंबेडकर

https://chat.whatsapp.com/EeBbSvL3MprA6R2zfCeaYM

आपण गरोदर आहात का?
गरोदर अवस्थेत तुमचा आहार आणि विहार कसा असला पाहिजे याची शास्त्रीय माहिती आपण घेतली आहे का?
गरोदर अवस्थेत बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी आपण काही प्रयत्न/ ऍक्टिव्हिटी करत आहात का?

तर मग फक्त आपल्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे

वेदामृत गर्भसंस्कार केंद्रातर्फे

ऑनलाईन गर्भसंस्कार कोर्सेस (मराठीमध्ये)

फक्त गरोदर महिलांसाठी

  • गर्भसंस्कार म्हणजे गर्भस्थ बालकाच्या बौद्धिक क्षमता वाढीसाठी, मेंदूच्या परिपूर्ण विकासासाठी आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी गर्भवतीने केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न.
  • तर मग हे गर्भसंस्कार आता तुम्हाला तुमच्या घरी बसल्या बसल्या, डेली रुटीन किंवा जॉब सांभाळून, कमीत कमी वेळेत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या कोर्स मार्फत करणे सहज शक्य आहे.गर्भसंस्कार (गरोदर माता व होणाऱ्या बालकासाठी एक वरदान)
    ✓ बुद्धिमान व आरोग्यसंपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी
    ✓ आपल्याला जश्या हव्या तश्या गुण व संस्कारांनी युक्त संतती जन्माला घालण्यासाठी
    ✓ नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी उपयुक्त
    ✓ जन्मापूर्वीपासून बाळाला शांत स्वभावाचे व प्रसन्न राहणारे करण्यासाठी
    ✓ गर्भवतीचे नऊ महिने हॅपी, हेल्दी राहण्यासाठी
    ✓ Delivery नंतरही आई व बाळ healthy राहण्यासाठी उपयुक्त
    ✓ Breast feeding proper होण्यासाठी उपयुक्त इ……

For details Contact personally on : 📲 9209331979 |  7219543883

Join WhatsApp Group
Facebook page: 
Our youtube channel:
Telegram group
Kindly visit Our website

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!