Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : चर्चेतली बातमी : शिवसेनेच्या दोन्हीही गटांचा दसरा मेळाव्यावर करोडोंचा खर्च …

Spread the love

मुंबई : उद्या मुंबईत होत असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याची  मोठी स्पर्धा लागली असून शिंदे गटाच्या वतीने खासगी आणि एसटी महामंडळाच्या हजारो गाड्या बुक केल्या असल्याचे वृत्त चर्चेत आहे.


या निमित्ताने तब्बल दहा हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. यामध्ये सहा हजार एसटी तसेच खासगी बसगाड्यांचा समावेश आहे. या मेळाव्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाने लोकांना मेळाव्याला आणण्यासाठी तब्बल १८०० एसटी बसेसचं बुकिंग केल्याचं समोर आलं आहे. यासाठी तब्बल १० कोटी रुपये रोख भरले असल्याच्या वृत्ताने खळबळ उडवून दिली आहे.

मध्यमन्नी दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सोमवारी सायंकाळी ५ पर्यंत १८०० एसटी गाड्यांचे आरक्षण केले होते. तीन हजार खासगी गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण पूर्ण झाले आहे. बांद्रा कुर्ला संकुलात सभा होत असल्याने लाख-दीड लाख लोकांची गर्दी अपेक्षित आहे. ही गर्दी जमविण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी गेली १५ दिवस जिल्हा-तालुका पिंजून काढला आहे. प्रत्येक शिवसैनिकाची मुंबईत येण्यापासून राहण्या-खाण्यापर्यंतची व्यवस्था होईल, अशी तयारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचीही जय्यत तयारी …

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने १४०० खासगी बस आरक्षित केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील शिवसेनेच्या शाखाप्रमुख, नगरसेवक यांना स्वखर्चाने कार्यकर्ते सभास्थळी येण्याच्या सूचना आहेत. कसारा, कर्जत, खोपोली, पालघर, विरार, डहाणू रोड येथून येणाऱ्या मिनी बस, टेम्पो ट्रॅव्हलर, सात आसनी कार अशा वाहनांची संख्यादेखील हजारोंच्या संख्येत असेल. दोन्ही सभांसाठी एकूण जवळपास दहा हजार वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे, असे राज्यातील खासगी बसचालक-मालकांकडून सांगण्यात आले.

 

 

 

 

 

 

 

 


MaharshtraNewsUpdate : भारतीय बौद्ध  महासभेचे नागपुरात प्रथमच राष्ट्रीय अधिवेशन : भीमराव आंबेडकर

https://chat.whatsapp.com/EeBbSvL3MprA6R2zfCeaYM

आपण गरोदर आहात का?
गरोदर अवस्थेत तुमचा आहार आणि विहार कसा असला पाहिजे याची शास्त्रीय माहिती आपण घेतली आहे का?
गरोदर अवस्थेत बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी आपण काही प्रयत्न/ ऍक्टिव्हिटी करत आहात का?

तर मग फक्त आपल्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे

वेदामृत गर्भसंस्कार केंद्रातर्फे

ऑनलाईन गर्भसंस्कार कोर्सेस (मराठीमध्ये)

फक्त गरोदर महिलांसाठी

  • गर्भसंस्कार म्हणजे गर्भस्थ बालकाच्या बौद्धिक क्षमता वाढीसाठी, मेंदूच्या परिपूर्ण विकासासाठी आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी गर्भवतीने केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न.
  • तर मग हे गर्भसंस्कार आता तुम्हाला तुमच्या घरी बसल्या बसल्या, डेली रुटीन किंवा जॉब सांभाळून, कमीत कमी वेळेत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या कोर्स मार्फत करणे सहज शक्य आहे.गर्भसंस्कार (गरोदर माता व होणाऱ्या बालकासाठी एक वरदान)
    ✓ बुद्धिमान व आरोग्यसंपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी
    ✓ आपल्याला जश्या हव्या तश्या गुण व संस्कारांनी युक्त संतती जन्माला घालण्यासाठी
    ✓ नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी उपयुक्त
    ✓ जन्मापूर्वीपासून बाळाला शांत स्वभावाचे व प्रसन्न राहणारे करण्यासाठी
    ✓ गर्भवतीचे नऊ महिने हॅपी, हेल्दी राहण्यासाठी
    ✓ Delivery नंतरही आई व बाळ healthy राहण्यासाठी उपयुक्त
    ✓ Breast feeding proper होण्यासाठी उपयुक्त इ……

For details Contact personally on : 📲 9209331979 |  7219543883

Join WhatsApp Group
Facebook page: 
Our youtube channel:
Telegram group
Kindly visit Our website

Join MahaClassifide WhatsApp Group
📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!