Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरील करोडोचा चुराडा , कोण काय म्हणाले ?

Spread the love

पुणे  : आपलाच मेळावा सरस व्हावा अशी स्पर्धा लागल्याने दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून १० कोटी रुपये रोख भरल्याचे वृत्त प्रसारित होताच देशात नोटबंदी झालेली असताना १० कोटी रुपयांची इतकी मोठी रोख रक्कम कुठून आली असे म्हणत विरोधकांनी शिंदे गटावर टीका सुरु केली आहे. खा . सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी केली आहे.


सुप्रिया सुळे म्हणाल्या कि , शिंदे गटाने बसेससाठी दहा कोटीची कॅश भरली आहे, असं माझ्या वाचनात आत्ताच आलं. ज्यांनी देशात नोटबंदीचा निर्णय लागू केला त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास ही बाब मी आणून देणार आहे. एवढी कॅश आली कठून हा प्रश्न आहे. कारण याच मुद्द्यावर आम्ही संसदेत फारच गंभीरपणे चर्चा केलेली आहे. इतक्या नोटा सर्क्युलेशनमध्ये कशा आल्या. जर  देशात नोटबंदी झाली आहे, तर मग इतक्या नोटा सर्क्युलेशनमध्ये येणे अशक्य आहे. म्हणूनच मला वाटतं की याची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे.

हा खूपच गंभीर विषय…

हा खूपच गंभीर विषय आहे. आपण सगळ्यांनीच हा विषय फार गांभिर्याने घेतला पाहिजे. कारण आम्ही नोटा कमी करत आहोत आणि सर्व ट्रान्झॅक्शन ऑनलाइन आणि बँकेमार्फत करत आहोत. त्यामुळे कोणाच्याच हातात नोटा नसतात. मग या नोटा आल्या कुठून? हा विषय चिंताजनक आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. दरम्यान या एवढ्या नोटा खोक्यातून आल्यात का, असा प्रश्न पत्रकारांनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, याबद्दल मला माहिती नाही. पण याची चौकशी व्हायला पाहिजे, असे खासदार सुळे म्हणाल्या.

उद्धव ठाकरेंच्या बहिणीचीही प्रतिक्रिया…

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आत्तेबहीण कीर्ती पाठक यांनीही या १० कोटींच्या प्रकरणावर आक्षेप नोंदवत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे कि , “एसटी महामंडळाच्या १८०० बसेस दसरा मेळाव्यासाठी बूक केल्याचं वृत्त आहे. सार्वजनिक वाहतूक ही सामान्यांची मूलभूत हक्काची सेवा असून त्यावर गदा आणली जात आहे. सगळ्यांनाच काही दसरा मेळाव्याला जायचं नाही. मग जर सामान्य नागरिकांना दसऱ्याचा सण आपल्या कुटुंबासोबत साजरा करायचा असेल, तर ते एसटी बसने प्रवास करु शकणार की नाही?” असा सवाल कीर्ती पाठक यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केला.

“दरवर्षी शिवसैनिक तळमळीने आणि ओढीने शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला येतात. तुमच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पुढच्या पिढीला काय आदर्श ठेवताय?” असाही प्रश्न कीर्ती पाठक यांनी विचारला. शिवसैनिकांच्या खाण्यापिण्याची सोय होत असल्याचंही पहिल्यांदाच घडत आहे. लोक घरुन पोळी भाजीचे डबे घेऊन यायचे, पाणी घेऊन यायचे, जमिनीवर मांडी घालून बसायचे, आपापल्या खर्चाने स्वतःच्या परीने झेपेल तसे यायचे, अशी माहितीही त्यांनी दिली.


ईडी-आयटीने चौकशी करावी : अतुल लोंढे

दसरा मेळाव्यासाठी ST बसेस बुक करण्यासाठी शिंदे गटाने १० कोटी रुपये रोख दिल्याचे बातम्यांमधून समजते आहे. ही रक्कम शिवसेना पक्षाच्या खात्यातून दिली आहे का? नसेल तर ही रक्कम कुठून आणली ? १० कोटींचा रोख व्यवहार कसा केला ? ED आणि IT ने याची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

 

MaharshtraNewsUpdate : भारतीय बौद्ध  महासभेचे नागपुरात प्रथमच राष्ट्रीय अधिवेशन : भीमराव आंबेडकर

https://chat.whatsapp.com/EeBbSvL3MprA6R2zfCeaYM

आपण गरोदर आहात का?
गरोदर अवस्थेत तुमचा आहार आणि विहार कसा असला पाहिजे याची शास्त्रीय माहिती आपण घेतली आहे का?
गरोदर अवस्थेत बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी आपण काही प्रयत्न/ ऍक्टिव्हिटी करत आहात का?

तर मग फक्त आपल्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे

वेदामृत गर्भसंस्कार केंद्रातर्फे

ऑनलाईन गर्भसंस्कार कोर्सेस (मराठीमध्ये)

फक्त गरोदर महिलांसाठी

  • गर्भसंस्कार म्हणजे गर्भस्थ बालकाच्या बौद्धिक क्षमता वाढीसाठी, मेंदूच्या परिपूर्ण विकासासाठी आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी गर्भवतीने केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न.
  • तर मग हे गर्भसंस्कार आता तुम्हाला तुमच्या घरी बसल्या बसल्या, डेली रुटीन किंवा जॉब सांभाळून, कमीत कमी वेळेत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या कोर्स मार्फत करणे सहज शक्य आहे.गर्भसंस्कार (गरोदर माता व होणाऱ्या बालकासाठी एक वरदान)
    ✓ बुद्धिमान व आरोग्यसंपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी
    ✓ आपल्याला जश्या हव्या तश्या गुण व संस्कारांनी युक्त संतती जन्माला घालण्यासाठी
    ✓ नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी उपयुक्त
    ✓ जन्मापूर्वीपासून बाळाला शांत स्वभावाचे व प्रसन्न राहणारे करण्यासाठी
    ✓ गर्भवतीचे नऊ महिने हॅपी, हेल्दी राहण्यासाठी
    ✓ Delivery नंतरही आई व बाळ healthy राहण्यासाठी उपयुक्त
    ✓ Breast feeding proper होण्यासाठी उपयुक्त इ……

For details Contact personally on : 📲 9209331979 |  7219543883

Join WhatsApp Group
Facebook page: 
Our youtube channel:
Telegram group
Kindly visit Our website

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!