Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : शिंदे – फडणवीस सरकारची ७ कोटी लोकांना दिवाळी भेट …

Spread the love

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने दिवाळीनिमत्त रेशन कार्ड धारकांसाठी  रवा, चणाडाळ, साखर यांचे प्रत्येकी एक-एक किलो, तर एक लीटर पाम तेल असे पॅकेज अवघ्या शंभर रुपयात देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय

दरम्यान, मदत व पुनर्वसन विभागांतर्गत आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमणार.

नगर विकास विभागांतर्गत नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार. सुधारित खर्चास मान्यता.

जलसंपदा विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार. योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता.

उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार. खर्चास सुधारित मान्यता. ८ दुष्काळी तालुक्यांना फायदा

पोलिसांना घरबांधणीसाठी कर्ज

राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शासनाच्या १० एप्रिल २०१६ च्या निर्णयाप्रमाणे राज्यातील पोलिसांना खाजगी बँकांकडून कर्ज घेऊन पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत योजना राबवण्यात येत होती. त्याप्रमाणे ५ हजार १७ पोलीस अधिकारी व अंमलदारांना मे २०१९ पर्यंत घरबांधणी अग्रीम देण्यात आलं आहे. त्यानंतर ७ जून २०२२ च्या शासन निर्णयाप्रमाणे ही योजना खंडीत करून पोलिसांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय नियमित घरबांधणी अग्रीम योजना देण्याचा निर्णय झाला होता.

या घरबांधणी अग्रीमासाठी सरकारकडे ७ हजार ९५० अर्ज प्राप्त झाले असून त्यासाठी २ हजार १२ कोटीची गरज भासणार आहे. परंतु इतकी मोठी रक्कम शासनाकडून एकरकमी उपलब्ध होणे शक्य नसल्याने पूर्वी प्रमाणेच बँकामार्फत कर्ज घेण्याची योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना आता पुन्हा बँकांकडून कर्ज घेऊन घरबांधणी करावी लागणार आहे.

 

 



MaharshtraNewsUpdate : भारतीय बौद्ध  महासभेचे नागपुरात प्रथमच राष्ट्रीय अधिवेशन : भीमराव आंबेडकर

https://chat.whatsapp.com/EeBbSvL3MprA6R2zfCeaYM

आपण गरोदर आहात का?
गरोदर अवस्थेत तुमचा आहार आणि विहार कसा असला पाहिजे याची शास्त्रीय माहिती आपण घेतली आहे का?
गरोदर अवस्थेत बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी आपण काही प्रयत्न/ ऍक्टिव्हिटी करत आहात का?

तर मग फक्त आपल्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे

वेदामृत गर्भसंस्कार केंद्रातर्फे

ऑनलाईन गर्भसंस्कार कोर्सेस (मराठीमध्ये)

फक्त गरोदर महिलांसाठी

  • गर्भसंस्कार म्हणजे गर्भस्थ बालकाच्या बौद्धिक क्षमता वाढीसाठी, मेंदूच्या परिपूर्ण विकासासाठी आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी गर्भवतीने केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न.
  • तर मग हे गर्भसंस्कार आता तुम्हाला तुमच्या घरी बसल्या बसल्या, डेली रुटीन किंवा जॉब सांभाळून, कमीत कमी वेळेत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या कोर्स मार्फत करणे सहज शक्य आहे.गर्भसंस्कार (गरोदर माता व होणाऱ्या बालकासाठी एक वरदान)
    ✓ बुद्धिमान व आरोग्यसंपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी
    ✓ आपल्याला जश्या हव्या तश्या गुण व संस्कारांनी युक्त संतती जन्माला घालण्यासाठी
    ✓ नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी उपयुक्त
    ✓ जन्मापूर्वीपासून बाळाला शांत स्वभावाचे व प्रसन्न राहणारे करण्यासाठी
    ✓ गर्भवतीचे नऊ महिने हॅपी, हेल्दी राहण्यासाठी
    ✓ Delivery नंतरही आई व बाळ healthy राहण्यासाठी उपयुक्त
    ✓ Breast feeding proper होण्यासाठी उपयुक्त इ……

For details Contact personally on : 📲 9209331979 |  7219543883

Join WhatsApp Group
Facebook page: 
Our youtube channel:
Telegram group
Kindly visit Our website

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!