Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliNewsUpdate : बंद लिफ्टमुळे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची हेळसांड…

Spread the love

 हिंगोली/ प्रभाकर नांगरे : हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात सुमारे १ कोटी रुपये खर्च करून सुरु करण्यात आलेली लिफ्ट बंद आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना तब्बल तीन मजले चढून जावे लागत आहे.


मोतीबिंदूच्या रुग्णांसाठी शस्त्रक्रियेनंतर ही दुसरी परिक्षाच ठरत आहे. शस्त्रक्रियेनंतर नातेवाईकांनाच रुग्णांना धरून वॉर्डमध्ये न्यावे लागत आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना इन्फेक्शन होऊ नये तसेच त्यांच्या डोळ्यांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला होता. मात्र कोविडच्या काळात या कक्षात कार्यालय थाटण्यात आले आहे. अद्यापही या कक्षात कार्यालय सुरुच आहे. शासकिय रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया उत्कृष्ट पद्धतीने होत असल्याने रुग्णांची संख्या होईल.

वाढली आहे. दररोज तीस ते चाळीस रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. मात्र, शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना तीन मजले चढावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयातील कर्मचारीही यासाठी मदत करत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे आता लिफ्ट कधी सुरु होणार, असा प्रश्न रुग्ण व नातेवाईक विचारत आहेत.

रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी सांगितले की, शासकिय रुग्णालयात उभारण्यात आलेली लिफ्ट सुरु झालेली नाही. सध्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तातडीने लिफ्ट सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ व इतर यंत्रांची उपलब्धता झाल्यानंतर लवकरच लिफ्ट सुरु होइल असे सांगण्यात आले आहे.

 


HingoliNewsUpdate : जाणून घ्या हिंगोलीतील १६७ वर्षांच्या दसरा महोत्सवाविषयी ….

 

https://chat.whatsapp.com/EeBbSvL3MprA6R2zfCeaYM

आपण गरोदर आहात का?
गरोदर अवस्थेत तुमचा आहार आणि विहार कसा असला पाहिजे याची शास्त्रीय माहिती आपण घेतली आहे का?
गरोदर अवस्थेत बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी आपण काही प्रयत्न/ ऍक्टिव्हिटी करत आहात का?

तर मग फक्त आपल्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे

वेदामृत गर्भसंस्कार केंद्रातर्फे

ऑनलाईन गर्भसंस्कार कोर्सेस (मराठीमध्ये)

फक्त गरोदर महिलांसाठी

  • गर्भसंस्कार म्हणजे गर्भस्थ बालकाच्या बौद्धिक क्षमता वाढीसाठी, मेंदूच्या परिपूर्ण विकासासाठी आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी गर्भवतीने केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न.
  • तर मग हे गर्भसंस्कार आता तुम्हाला तुमच्या घरी बसल्या बसल्या, डेली रुटीन किंवा जॉब सांभाळून, कमीत कमी वेळेत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या कोर्स मार्फत करणे सहज शक्य आहे.गर्भसंस्कार (गरोदर माता व होणाऱ्या बालकासाठी एक वरदान)
    ✓ बुद्धिमान व आरोग्यसंपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी
    ✓ आपल्याला जश्या हव्या तश्या गुण व संस्कारांनी युक्त संतती जन्माला घालण्यासाठी
    ✓ नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी उपयुक्त
    ✓ जन्मापूर्वीपासून बाळाला शांत स्वभावाचे व प्रसन्न राहणारे करण्यासाठी
    ✓ गर्भवतीचे नऊ महिने हॅपी, हेल्दी राहण्यासाठी
    ✓ Delivery नंतरही आई व बाळ healthy राहण्यासाठी उपयुक्त
    ✓ Breast feeding proper होण्यासाठी उपयुक्त इ……

For details Contact personally on : 📲 9209331979 |  7219543883

Join WhatsApp Group
Facebook page:
Our youtube channel:
Telegram group
Kindly visit Our website

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!