Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : आरतीच्या वेळी मोठी आग , ५० हून अधिक होरपळले …

Spread the love

लखनौ : उत्तर प्रदेशातील भदोहीमध्ये नवरात्रानिमित्त रविवारी रात्री दुर्गा पूजा मंडपाला लागलेल्या भीषण आगीत ५० हून अधिक लोक होरपळले. आरती दरम्यान हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोघांच्या  आगीमुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि रुग्णवाहिका बोलावण्यात आली. जखमींना रुग्णवाहिकेतून सूर्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी एकच गोंधळ आणि आरडाओरडा झाला. विशेष म्हन्जे हे घटनास्थळ  पोलिस ठाण्याजवळच आहे. आरती करताना ठिणगी पडल्याने आग लागल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक उपस्थित आहेत. आग एवढी भीषण होती की संपूर्ण पंडाल जळून खाक झाले आणि तेथे ठेवलेले सर्व सामान जळून खाक झाले. मात्र, मूर्तींचे कोणतेही नुकसान झाले नाही. पोलीस अधिकाऱ्याने दावा केला, ‘औराई शहरात रात्री ९ च्या सुमारास दुर्गा पंडालमध्ये आग लागली. आरतीची वेळ झाली होती. त्यावेळी तेथे अनेक लोक उपस्थित होते. यामध्ये १०-१५ जण जखमी झाले असून त्यांना  तातडीने ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री योगी यांनी या प्रकरणाची घेतली दखल

दरम्यान या मंडपाला  आग लागल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याची दखल घेतली आणि अपघातात जखमी झालेल्यांवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. आज नवरात्रीची सप्तमी पूजा असल्याने अनॆक लोक दुर्गा देवीच्या दर्शनासाठी मंडपामध्ये उपस्थित होते.

 


HingoliNewsUpdate : जाणून घ्या हिंगोलीतील १६७ वर्षांच्या दसरा महोत्सवाविषयी ….

https://chat.whatsapp.com/EeBbSvL3MprA6R2zfCeaYM

आपण गरोदर आहात का?
गरोदर अवस्थेत तुमचा आहार आणि विहार कसा असला पाहिजे याची शास्त्रीय माहिती आपण घेतली आहे का?
गरोदर अवस्थेत बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी आपण काही प्रयत्न/ ऍक्टिव्हिटी करत आहात का?

तर मग फक्त आपल्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे

वेदामृत गर्भसंस्कार केंद्रातर्फे

ऑनलाईन गर्भसंस्कार कोर्सेस (मराठीमध्ये)

फक्त गरोदर महिलांसाठी

  • गर्भसंस्कार म्हणजे गर्भस्थ बालकाच्या बौद्धिक क्षमता वाढीसाठी, मेंदूच्या परिपूर्ण विकासासाठी आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी गर्भवतीने केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न.
  • तर मग हे गर्भसंस्कार आता तुम्हाला तुमच्या घरी बसल्या बसल्या, डेली रुटीन किंवा जॉब सांभाळून, कमीत कमी वेळेत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या कोर्स मार्फत करणे सहज शक्य आहे.गर्भसंस्कार (गरोदर माता व होणाऱ्या बालकासाठी एक वरदान)
    ✓ बुद्धिमान व आरोग्यसंपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी
    ✓ आपल्याला जश्या हव्या तश्या गुण व संस्कारांनी युक्त संतती जन्माला घालण्यासाठी
    ✓ नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी उपयुक्त
    ✓ जन्मापूर्वीपासून बाळाला शांत स्वभावाचे व प्रसन्न राहणारे करण्यासाठी
    ✓ गर्भवतीचे नऊ महिने हॅपी, हेल्दी राहण्यासाठी
    ✓ Delivery नंतरही आई व बाळ healthy राहण्यासाठी उपयुक्त
    ✓ Breast feeding proper होण्यासाठी उपयुक्त इ……

For details Contact personally on : 📲 9209331979 |  7219543883

Join WhatsApp Group
Facebook page:
Our youtube channel:
Telegram group
Kindly visit Our website

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!