Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : कोण आहेत मल्लिकार्जुन खर्गे …? आणि त्यांना “सोलीलदा सरदारा” का म्हणतात ?

Spread the love

नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज आपला अर्ज  भरला आहे. त्यामुळे खर्गे आणि शशी थरूर यांच्यात मुख्य लढत होईल असे चित्र असले तरी गांधी परिवाराच्या मूक पाठिंब्यामुळे कर्नाटक काँग्रेसचे नेते मल्लिकाजुर्न खर्गे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. दिग्विजय सिंग शर्यतीतून बाहेर होत असताना के.एन. त्रिपाठी हे या निवडणुकीतील आणखी एक उमेदवार आहेत.


कोण आहेत मल्लिकार्जुन खर्गे …?

मल्लिकार्जुन खर्गे हे त्यांच्या कर्नाटक राज्यात “सोलीलदा सरदारा ( पराभव न करता येणार नेता)” म्हणून प्रसिद्ध आहेत. ते गांधी घराण्याच्या कट्टर निष्ठावंतांपैकी एक मानले जातात. खरगे यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यास, ते या पदावर असणारे कर्नाटक राज्यातील दुसरे नेते असतील. त्यांच्या आधी कर्नाटकातील एस. निजलिंगप्पा यांनी हे पद भूषवले आहे. तसेच ते निवडून आल्यास जगजीवन राम यांच्यानंतर खरगे हे दुसरे दलित नेते असतील. ८० वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे हे पाच दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय आहेत. ते सलग नऊ वेळा आमदार राहिले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुलबर्गा (आता कलबुर्गी) या त्यांच्या गृहराज्यातून केंद्रीय नेते म्हणून सुरुवात केली, तेव्हापासून त्यांचा आलेख सातत्याने चढत गेला.

अजिंक्य योद्धा अशी प्रतिमा असलेला नेता …

१९६९ मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झालेले खर्गे गुलबर्गा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही राहिले आहेत. गुरुमितकल विधानसभा मतदारसंघातून सलग ९ निवडणुका जिंकण्याची किमया मल्लिकार्जन खरगे यांच्या नावावर आहे. निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रतिमा ‘अजिंक्य योद्धा’ अशी राहिली आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी लाट असूनही त्यांनी गुलबर्गा मतदारसंघातून ७४ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यांनी दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गुलबर्गा मतदारसंघातून भाजपच्या उमेश जाधव यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. खरगे यांचा जवळपास पाच दशकांतील हा पहिलाच निवडणूक पराभव होता.

गांधी घराण्याचे निष्ठावंत मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये कामगार आणि रोजगाराव्यतिरिक्त ते रेल्वे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री राहिले आहेत. जून २०२० मध्ये, ते कर्नाटकमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आणि सध्या ते वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. खरगे यांची एक सभ्य आणि नम्र नेते अशी प्रतिमा आहे.

बिदर जिल्ह्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या खर्गे यांनी गुलबर्गा येथून बीए नंतर कायद्याची पदवी मिळवली. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी काही काळ वकिलीची प्रॅक्टिसही केली. मल्लिकार्जन खर्गे यांचा विवाह १३ मे १९६८ रोजी राधाबाई यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुली आणि तीन मुले आहेत. मल्लिकार्जन खर्गे यांचा मुलगा प्रियांक सध्या आमदार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!