Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SCReservationNewsUpdate : मोठी बातमी : बँकांमधील अनुसूचित जातीचा अनुशेष भरण्यासाठी गांधी जयंती पासून विशेष अभियान …

Spread the love

नवी दिल्ली: सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSBs) गांधी जयंतीपासून अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या जुन्या रिक्त पदांवर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे (NCSC) अध्यक्ष विजय सांपला म्हणाले की,  PSBs अनुसूचित जाती (SC) साठी ओळखल्या गेलेल्या ‘बॅकलॉग’ पदांवर २ ऑक्टोबरपासून भरतीची प्रक्रिया सुरू करतील. तसेच अनुसूचित जातींसाठी चालवल्या जाणाऱ्या कर्ज आणि कल्याणकारी योजनांच्या मुद्द्यावर सार्वजनिक बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीनंतर भरती मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांपला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमवेत झालेल्या बैठकीचे सह-अध्यक्ष होते.


 या बैठकीत सार्वजनिक बँकांकडून अनुसूचित जातीच्या लोकांना दिलेल्या कर्जाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. याशिवाय नोकऱ्यांमधील आरक्षण आणि आधीच रिक्त असलेल्या पदांवरील भरती या मुद्द्यांवरही चर्चा झाली. अनुसूचित जातीच्या प्रमुखांनी येथे पत्रकारांना सांगितले की, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका अनुशेष रिक्त पदे भरण्यासाठी २ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत भरती मोहीम राबवतील. यासोबतच या बँकांना एससी समुदायाशी संबंधित तक्रारी ३१ डिसेंबरपर्यंत निकाली काढण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सांपला म्हणाले की, बँका त्यांच्या आरक्षण धोरणाचा अहवाल देखील देतील, ज्यामध्ये सर्व योजनांमध्ये एससी समुदायाच्या सहभागाचा आणि भरतीचा विशेष उल्लेख केला जाईल. हा अहवाल बँकांना वर्षातून दोनदा पाठवावा लागेल, असे ते म्हणाले. याशिवाय आउटसोर्सिंगवर नियुक्त केलेल्या सर्व कर्मचार्‍यांना किमान वेतन देण्याची खात्री करण्यासही बँकांना सांगण्यात आले आहे. तसेच कर्ज मंजूर झाल्यानंतरही, बँकाकडून  वितरीत न झालेल्या कर्जाचा आढावा आणि अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!