Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PFI-RSS-ControversyUpdate : चर्चेतली बातमी : आरएसएसच्या बंदीच्या मागणीवरून फडणवीस, खा . शेट्टी यांचे प्रत्युत्तर …

Spread the love

मुंबई : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरदेखील बंदी घालण्याची मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे . या नेत्यांना उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आरएसएस ही जगातील सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेवर बंदी घालण्याची ताकद देशात कोणातही नाही, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. विरोधी पक्ष भाजपा आणि आरएसएसवर उठसूठ आरोप करत असतात. त्यांनी २०२४ च्या निवडणुकीपर्यंत असेच आरोप करत राहावेत. यामुळे आमचे कार्यकर्ते आणखी जागरुक होतील, असा सल्ला शेट्टी यांनी दिला आहे.


पीएफआयवरील कारवाईनंतर राष्ट्रीय जनता दलाचे  प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आरएसएस एक हिंदू अतिरेकी संघटना आहे, असा आरोप यादव यांनी केला आहे. यावर बोलताना शेट्टी यांनी म्हटले आहे कि , आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी म्हणजे या संघटनेवर हल्ला करण्याची नवी पद्धत आहे. लालू यादव हे मतांचे राजकारण करत आहेत.

दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्याआधी केरळमधील काँग्रेस खासदार के. सुरेश यांनीही  आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या मागणीचा समाचार घेताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे कि ,  “असे मुर्खासारखे बोलणारे लोक अनेक आहेत. या देशात कायदा आणि संविधान अस्तित्वात आहे. कुठल्याही संघटनेवर बंदी घालण्यासाठी पुरावे लागतात”.

पीएफआयच्या औरंगाबाद कार्यालयालाही सील

एनआयएने मंगळवारी आठ राज्यांमध्ये पीएफआयवर छापेमारी करीत या कारवाईत १७० जणांना अटक केली आहे. याआधी २२ सप्टेंबरला १५ राज्यांत छापे घालून एनआयएने पीएफआयच्या १०६ कार्यकर्त्यांसह नेत्यांना अटक केली होती. या कारवाईची दखल घेत बुधवारी केंद्र सरकारने पीएफआयला बेकायदेशीर ठरवत बंदी घातली आहे. औरंगाबाद शहरातील पीएफआय च्या कार्यालयालाही पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सील केले आहे.


दरम्यान पीएफआयच्या कारवाया लक्षात घेऊन केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयवर बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पीएफआयवरील बंदीचे समर्थन केले जाऊ शकत नाही, अशी भूमिक घेतली आहे. तर काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांनी पीएफआयवरील बंदीचे समर्थन केले असून पीएफआयप्रमाणेच देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.

काय म्हणाले होते लालूप्रसाद यादव ?

पीएफआयप्रमाणेच समाजात द्वेष पसरवणाऱ्या इतर संघटांवरही बंदी घालायला हवी. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचादेखील समावेश आहे. सर्वात अगोदर आरएसएसवर बंदी घातली पाहिजे. कारण ही संघटना पीएफआयपेक्षाही वाईट आहे. याआधीही आरएसएसवर दोन वेळा बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये लोहपुरूष सरदार पटेल यांनीच आरएसएसवर बंदी घातली होती, हे लक्षात ठेवायला हवे, असे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/asadowaisi/status/1575030412807614464

एमआयएम प्रमुख ओवैसी यांचे ट्विट …

“ख्वाजा अजमेरी बॉम्बस्फोटात दोषी संघटनेवर अद्याप बंदी नाही, मग पीएफआयवरच का? सरकारने उजव्या विचारसरणीच्या बहुसंख्य संघटनांवर बंदी का घातली नाही?” असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. ‘यूएपीए’ कायद्याअंतर्गत पीएफआयवर कारवाई करण्यात आल्यानंतर या कायद्यातील सुधारणेवरुन ओवैसी यांनी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने सुधारणा करत ‘यूएपीए’ कायदा कडक केला. भाजपानेही या कायद्यात सुधारणा करत तो आणखी कठोर बनवला, याला काँग्रेसने समर्थन दिले. कप्पन प्रकरणाचे उदाहरण देताना या कायद्यामुळे कुठलाही कार्यकर्ता किंवा पत्रकाराला अटक झाल्यानंतर जामीन मिळवण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल, असे ओवैसी यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!