Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कौन कहता है , हो नही सकता ? एका सामान्य गृहिणीने हे काय केले ते पाहाच …

Spread the love

जयपूर : पुरुष असो कि स्त्री एकदा काही करायचे मनापासून ठरवले तर त्यांना ते करण्यापासून कोणतीही शक्ती परावृत्त करू शकत नाही. असाच एक अंगाला वेगळा आदर्श  सामान्य गृहिणी म्हणवणारी अंजूने जगासमोर ठेवला आहे. आपल्या संकल्पामुळे जयपूरस्थित अंजू मीना यांची हि गोष्ट आहे. सामान्य गृहिणी ते “पॉवरलिफ्टर ” आणि पुढे राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू बनण्याच्या प्रवासाने सर्वांनाच थक्क केले आहे.


अंजू मीना हि सामान्य महिलांप्रमाणे लग्नानंतर घरातील कामात व्यस्त होती, मात्र आई झाल्यानंतर तिने वजन कमी करण्यासाठी व्यायाम करायला सुरुवात केली. अंजूने काही महिन्यांच्या कालावधीत २५ किलोपेक्षा जास्त वजन तर कमी केलेच पण तिने  आज  बॉडी बिल्डिंग आणि वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशनने आपला ठसा उमटवला आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

एनडीटीव्ही बोलताना अंजूने तिच्या वर्कआउट रूटीनबद्दल आणि जेवणाविषयी सांगितले ज्यामुळे तिला वजन कमी करण्यात मदत झाली. अंजू म्हणते, “मी २ मुलांची आई आहे आणि गरोदरपणातच माझे वजन खूप वाढले होते. मी डाएटिंग करण्याचा प्रयत्न केला पण मला अशक्तपणा जाणवू लागला. माझे वजन ७२ किलोपर्यंत वाढले होते आणि मला वजन कमी करणे आवश्यक होते. सुरुवातीला मी काम करू लागले. घराच्या स्टोअर रूममध्ये. मी घरीच डंबेल आणि बारबेल असलेली एक छोटी जिम लावली होती. त्यानंतर मी जिमचा कोर्स जॉईन केला आणि २५ किलो वजन कमी केले.”

असा आहे आहार

तिच्या वर्कआउटमध्ये वजन उचलण्यासोबतच अंजू दररोज १०,००० हून अधिक पावले चालते. यासोबतच ती डाएटवर विशेष लक्ष देते. अंजू ब्रेकफास्टमध्ये ब्रेड, बटर, २ अंडी आणि दूध पितात. दुपारच्या जेवणात ती भात आणि सोयाचे तुकडे खाणे पसंत करते. यानंतर, जेव्हा रात्रीच्या जेवणाची वेळ येते, तेव्हा इंजू मठ्ठा प्रोटीनचा एक स्कूप तसेच तांदूळ, राजमा किंवा इतर कोणत्याही डाळीला तिच्या आहाराचा भाग बनवते. स्नॅक्समध्ये तिला केळी आणि ड्रायफ्रूट्स खायला आवडतात.

…आणि सासू सासऱ्याचा पारा चढला !!

वजन कमी करण्याच्या प्रवासाच्या सुरुवातीला अंजूला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, जग हसले आणि लोकांनी तिला टोमणे मारले, पण अंजूने हार मानली नाही. लोक म्हणायचे की शरीर कसे मर्दानी केले आहे किंवा सासू म्हणायची की, या सुनेने आमचे नाक कापले आहे. शरीरसौष्ठव स्पर्धेतील बिकिनीतील फोटो पाहून तर सासू-सासऱ्याचा  पारा चढला होता. पण, अंजू पुढे जात राहिली. आज अंजू मीना जिम ट्रेनर्सना प्रशिक्षण देणाऱ्या फिटनेस अकादमीच्या संचालक आहेत. त्या व्यायाम आणि डायटिंगचे वर्ग देखील घेते. तसेच समाजाच्या किंवा कुटुंबाच्या दबावाखाली काही करू न शकणाऱ्या मुली आणि महिलांना पुढे आणायचे आहे, असे अंजू  आवर्जून सांगते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!