Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पंतप्रधान दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर , ३४०० कोटींच्या विकास कामांचे उदघाटन …

Spread the love

सुरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सूरतमध्ये त्यांनी तब्बल ३४०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन पार पडले. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून  त्यांच्या हस्ते गुजरातमध्ये ३६ वय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटनही होणार असून उद्या मुंबई – गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस’ला ते  हिरवा झेंडा दाखवणार आहेत.


दरम्यान गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार असून त्याआधीच नरेंद्र मोदींचा हा नियोजित दौरा पार पडत आहे. गुजरातमध्ये गेल्या ३० वर्षांपासून भाजपाचीच सत्ता आहे. आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद, गांधीनगर, सूरत, भावनगर आणि अंबाजी येथे भेट देणार आहेत. याठिकाणी अनेक विकास प्रकल्पांचं भुमीपूजन त्यांच्या हस्ते होणार असून लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

विविध विकास कामांचे उदघाटन करताना मोदी म्हणाले कि, “गुजरातमध्ये डबल इंजिन सरकार आल्यानंतर घर बांधणीच्या कामाला वेग आला आहे. सूरतमधील मध्यमवर्गीय, गरीब लोकांनाही सुविधा मिळत आहेत. आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत देशातील चार कोटी रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत. यामधील ३२ लाख गुजरात आणि १ लाख २५ हजार सूरतमधील आहेत,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले . ते पुढे म्हणाले की “नवरात्र साजरी होत असतानाच पायाभूत सुविधांचं भुमीपूजन, क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करणं हे माझं भाग्य समजतो. सूरत हे एकतेचं उत्तम उदाहरण आहे. देशभरातील लोक सूरतमध्ये वास्तव्यास आहेत. ही मिनी-भारत आहे”.

मुंबई – गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस’ला ते  हिरवा झेंडा…

दरम्यान पंतप्रधान नरेद्र मोदी उद्या(३० सप्टेंबर) ‘मुंबई – गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तर आगामी तीन वर्षांत अद्ययावत अशा ४०० वंदे भारत ट्रेन दाखल होणार आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. वंदे भारत ट्रेन हा पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. १५ ऑगस्ट २०२१ रोजी वंदे भारत ट्रेनने ७५ शहरांना जोडण्याबाबत ते बोलले होते. तेव्हापासून रेल्वे विभाग यावर वेगाने काम करत आहेत. हा प्रकल्प १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अंमलात आणण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या डब्यांची बांधणी चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यात करण्यात येत आहे. जवळपास ४०० वातानुकूलित ‘वंदे भारत’ गाडय़ांची बांधणी करण्यात येणार आहे. जीपीएस आधारित ऑडिओ व्हिजुअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असतील. प्रत्येक ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्ये १६ वातानुकूलित डबे असतील. एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार १२८ आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!